Manoj Jarange Patil : निवडणूक लढणार की नाही? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, पश्चातापाची वेळ आणेन; सरकारला अल्टिमेटम
Marartha Reservation Update : 4 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
![Manoj Jarange Patil : निवडणूक लढणार की नाही? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, पश्चातापाची वेळ आणेन; सरकारला अल्टिमेटम Manoj Jarange Patil Will you contest the election or not clearly said no to lok sabha election 2024 I will bring time of regret to Govt maharashtra politics Chhatrapati Sambhaji Nagar jalna marathi news Manoj Jarange Patil : निवडणूक लढणार की नाही? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, पश्चातापाची वेळ आणेन; सरकारला अल्टिमेटम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/18/91388b213636083a1de01ad9a56ea7351710771020427322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra News : छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून पक्षाने प्रचाराचा नारळही फोडला आहे. अनेक मराठा उमेदवारही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. मराठा (Maratha) समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निवडणूक लढण्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, राजकारण माझा मार्ग नाही, मी निवडणूक लढणार नाही. चळवळीतून न्याय देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार?
निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो, ते नेहमी जे बोलतात, ते स्पष्ट बोलतात. मात्र, राजकारण माझा मार्ग नाही.सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे, हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही, त्या मिळाल्या. सरकारने आमची वारंवार फसवणूक केली, आज देतो, उद्या देतो सांगून आमची फसवणूक केली, असं म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. बैठकीनंतर सरकार विचार करेल की, अंमलबजावणी करणं परवडलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे, अशी माहिती जरांगेंनी दिली आहे.
24 मार्चला पुढची दिशा ठरणार
ही प्रचंड मोठी बैठक आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते, मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एकमताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर, आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल.
मनोज जरांगे पाटलांची 900 एकरमध्ये भव्य सभा
900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की आपण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं आता उलटाच कुटाणा झाला तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावला तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)