Manoj Jarange Patil : माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय, मनोज जरांगेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, शंभूराज देसाईंकडे मोठी मागणी
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळले असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. याच मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळले असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. याच मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्यांची मला यादी द्या, अशी मागणी उपोषणावेळी आलेल्या शिष्टमंडळाकडे जरांगे यांनी केली आहे. माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय, वेळ आल्यावर त्या व्यक्तीचे नावही घेणार असल्याचा इशारा त्यांनी आज उपोषण स्थगित करताना दिला आहे. त्यामुळे 100 कोटी नेमके कोणी केले आहेत? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मी पहिल्यापासून सांगतोय, पण आज जबाबदारीने सांगतो. या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून काम घेतले असतील? कोणी पैसे घेतले असतील? माझं नाव सांगून का हाईना. मला ती यादी द्या. माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. मी जबाबदारीने हे सांगत आहे. वेळ आल्यावर तो कोण माणूस आहे, त्याचे नाव देखील घेणार आहे. तो म्हणलाय तर त्याची चौकशी करायची असेल तर करा. त्यामध्ये मी जर असलो तर मलाही सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तर त्यालाही सुट्टी नाही. मला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.
मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही पाच महिने मुदत दिली, त्यात 2 महिने आचारसंहितेमध्ये गेलत. वाशीच्या आंदोलनापासून सरकारला 5 महिन्यांचा वेळ दिला, पण सरकारने कोणतीही पाऊले उचलेले नाहीत. त्यामुळे आता तुम्ही सांगा आपण काय करायचे, असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी आता सरकारला 13 जुलैपर्यंत 1 महिन्याची मुदत दिली आहे. शिवाय, 1 महिन्याच्या आत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर विधानसभा निवडणूक लढवणार, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. दरम्यान, 1 महिन्यात सरकारने आरक्षणासंदर्भातील निर्णय दिला नाही तर मराठे ऐकणार नाहीत. या काळात मी निवडणूक लढवण्याची चळवळ सुरू करणार असून 14 जुलैला सरकारचा एक शब्दही ऐकणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले.
Manoj Jarange PC 6TH day Hunger Strike | राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला | ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या