Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मला गावठी म्हणतात, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय काय? मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना संतप्त सवाल
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal, Nanded : "मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत नाही. मराठ्यांचे मुले बेकार आहेत. भुजबळ मला गावठी म्हणतात, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय काय?", असा संतप्त सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना केला आहे.
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal, Nanded : "मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत नाही. मराठ्यांचे मुले बेकार आहेत. भुजबळ मला गावठी म्हणतात, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय काय?", असा संतप्त सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना केला आहे. मनोज जरांगेंची शांतता रॅली आज (दि.7) नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी ते बोलत होते.
मी पूर्ण येडा आहे, तू पायाने चालतो मी टकुऱ्याने चालतो
मनोज जरांगे म्हणाले, मी पूर्ण येडा आहे, तू पायाने चालतो मी टकुऱ्याने चालतो. आता आरक्षण मिळणार आहे. 54 लाख नोंदी सापडल्या होत्या, आता 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. हैदराबादला समिती गेली. फडणवीस यांना विनंती करायची तुम्ही भुजबळ बळ देत आहात, त्याचे मुके घ्या मला काही चिंता नाही, असंही जरांगे म्हणाले.
अडीच लाखापेक्षा जास्त समाज बांधव लातूर शहरात दाखल होण्याची शक्यता
मनोज जरांगे पाटील यांच्या लातूरमधील रॅलीची जय्यत तयारी झाली आहे. अडीच लाखापेक्षा जास्त समाज बांधव लातूर शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. 2000 पुरुष स्वयंसेवक आणि 400 महिला स्वयंसेवकांची फळी उद्याच्या नियोजनासाठी सज्ज झालीये. मराठा आरक्षणाचा विषय घेऊन मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या बारा वाजता ते लातूर शहरात दाखल होतील. शहरात प्रवेशापासून ते सांगते पर्यंत शहरातील काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातून अडीच लाखापेक्षा जास्त मराठा बांधव लातूर शहरात दाखल होण्याची अंदाज वर्तवला जात आहे.
मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी बारा वाजता हे लातूर शहरात प्रवेश करतील. लातूर शहरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम शाहू चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन केलं जाईल. या ठिकाणी त्यांची बीज तुला होणार आहे. इथून रॅली गंजगोलाईकडे मार्गस्थ होईल. गंजगोलाई ,महात्मा गांधी चौक आणि त्यानंतर आंबेडकर पार्क या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होईल.
लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यामधून मराठा समाज बांधव लातूरमध्ये उद्या सकाळपासूनच दाखल व्हायला सुरुवात होईल. अडीच लाखापेक्षा अधिक संख्येने मराठा समाज बांधव लातूरमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहनांची योग्य व्यवस्था लावण्यासाठी शहरात सहा ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. विविध ठिकाणावरून आलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य नियोजन लावण्यासाठी 2000 पुरुष स्वयंसेवक आणि 400 महिला स्वयंसेवक तयार करण्यात आले आहेत.
लीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार
मोठ्या संख्येने समाज बांधव शहरात दाखल होत असल्यामुळे वाहनांना शहरात प्रवेश बंदी असण्याची शक्यता आहे. एकाच ठिकाणी सर्व गर्दी होऊ नये असे नियोजन करण्यात आलं आहे. या रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. या ठिकाणी रात्री स्टेज उभारण्याचं काम सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता समारंभ होणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरातून जाणारे बार्शी रोड नांदेड रोड औसा रोड आंबेजोगाई रोड या भागातली वाहतूक रिंग रोड वरून वळवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या