एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंची अमित शाहांवर घणाघाती टीका, म्हणाले, 'कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?'

अमित शहा तुमची ती पद्धत चालणार नाही.ज्यांनी आयुष्य झिजवले त्या पक्षातील नेत्यांना तुम्ही बाजूला केले. असा आरोप करत जोरदार टीका केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मराठा आरक्षणावरून राज्यात राजकारण तापताना दिसत असून आरोप प्रत्यारोपांचे लोण उठले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचे उपोषण आचारसंहितापर्यंत स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आता थेट गृहमंत्री अमित शहांवर (Amit Shah) घणाघाती टीका केलीये. कळस बसवण्याआधी मूर्ती बसवणारे आंदोलन हाताळणार का? असा खोचक सवाल करत तुमचे राजकीय एन्काऊंटर होईल असा इशारा जरांगे यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांनाच दिला आहे. 

लोकांनी कष्ट करायचे आणि लोणी खायची तुमची घाण सवय असल्याची टीका मनोज जरांगे यांनी गृहमंत्री अमित शहांवर केली.मराठा आंदोलन गोडी गुलाबीने हाताळले तर तुम्हाला सत्तेवरून कोणीही हटवू शकत नाही पण नीट हाताळले नाही तर तुमच्यावर चिलमीचा चहा पिण्याची वेळ येईल असा इशारा जरांगे यांनी दिला. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आंदोलनाला तसे हाताळले तर..

अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, महाजन, जोशी यांनी स्वतःचा देह झिजविला मात्र, तुमचे हे कुटुंब होते म्हणून त्यांना तुम्ही हाताळले.मात्र, तुम्ही तसे मराठा आंदोलन हाताळू नका.आम्ही सहन करणार नाही.अमित शहा तुमची ती पद्धत चालणार नाही.ज्यांनी आयुष्य झिजवले त्या पक्षातील नेत्यांना तुम्ही बाजूला केले.तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत खूप घातक आहे.तुमच्याच लोकांचा तुम्ही घात केला.तुम्ही वर येण्यासाठी कोणता थराला गेला ते सांगायची गरज नाही अशी जोरदार टीका मनोज जरांगे यांनी गृहमंत्री अमित शहांवर केली.

फक्त तुमच्याकडेच दादा आणि गुंडा आहेत असं वाटतं ?

अमित शहा यांनी बरेच राजकीय एन्काऊंटर केले आता तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल असे मनोज जरांगे म्हणाले. कळस बसवण्याआधी मूर्ती बसवणारे हे आंदोलन हाताळणार का असा सवालही त्यांनी . मोदी आणि अमित शहा सरदार पटेल यांच्या स्थळाचे तुम्ही असे का केलत? फक्त तुमच्याकडेच दादा आणि गुंड आहेत असे वाटते का ? सगळ्यांकडे आहेत दादा आणि गुंड.यांच्या जीवावर तुम्ही दादागिरी करत असाल तर आमच्याकडे मराठा गुंड आहेत.असा इशाराच जरांगे यांनी दिला.

अमित शहांना कत्तली करायच्या आहेत का ?मनोज जरांगेचा सवाल

अमित शहा यांना कत्तली करायचं आहेत का ? दादागिरीने यांना खुर्ची आणायचे आहे. जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही . तुम्ही तुमच्यात काड्या लावल्या . भाजपमध्ये फोडाफोडी केली . आरेला कार्य केल्यास महाराष्ट्रापासून तर तिथपर्यंत कार्यक्रम करेल . मराठ्यांनी खिंडीत पकडले तर बेकार हाल होतील असे मनोज जरांगे म्हणाले .

हेही वाचा:

Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Protest Against Bangladesh Special Report : बांगलादेशात अन्याय, भारत पेटला; प्रकरण काय?INDIA Alliance Leadership issues : 'दादा' नको, 'दीदी' हवी? इंडिया आघाडीचा बॉस बदलणार? Special ReportKurla Best Bus Accident : मृत्यू सात, कुणामुळे घात? ड्रायव्हर की 'बेस्ट'? Special ReportMarkarwadi Politics : मारकडवाडीत राजकीय शोलेबाजी; पडळकर-खोतांची एन्ट्री,पवारांवर वार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget