एक्स्प्लोर

Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"

ज्या लोकांनी भाजपसाठी आयुष्य झिजवलं, अमित शाहांनी त्यांचाच घात केला; मनोज जरांगेंची घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर: अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन गोडीगुलाबीने हाताळले तर तुम्हाला सत्तेवरुन कोणीही हटवू शकत नाही. पण तुम्ही मराठा आंदोलन व्यवस्थित हाताळले नाही तर तुमच्यावर चिलमीची चहा पिण्याची वेळ येईल. अमित शाह (Amit Shah) यांनी मराठा समाजाला बाजूला ठेवले असते तर ती त्यांची घोडचूक ठरेल. त्यानंतर कोणतीही यंत्रणा आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू शकत नाही, असा निर्वाणीचा इशार मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अमित शाह यांच्यासह भाजपवर जोरदार आगपाखड केली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाबाबत दुजाभाव करु नये. तुम्ही खड्ड्यात पडा की उताणे पडा आम्हाला काहीही देणेघेणे नाही. इतर लोकांनी कष्ट करायचे आणि लोणी खायची ही अमित शाह यांची घाण सवय आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशी यांनी स्वत:चा देह झिजवला. तुमचे हे कुटुंब होते. त्यांना तुम्ही ज्याप्रकारे हाताळले तसे हे आंदोलन (Maratha Reservation Agitation) तुम्ही हाताळू नका. आम्ही हे सहन करणार नाही. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य झिजवले त्याच नेत्यांना तुम्ही बाजूला केले. अमित शाह तुमची ही पद्धत इकडे चालणार नाही. अमित शाह यांची ही आंदोलन हाताळण्याची पद्धत खूप घातक आहे. तुम्ही तुमच्याच लोकांचाच घात केला. तुम्ही पक्षात वर येण्यासाठी कोणत्या थराला गेलात, हे सांगायची गरज नाही. अमित शाह यांनी बरेच राजकीय एन्काउंटर केलेत. पण मराठा आरक्षण आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तुमचंच राजकीय एन्काउंटर होईल, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

मोहन भागवत खमके निघाले म्हणून तुमच्यासमोर टिकले: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरुन अमित शाह आणि भाजपला लक्ष्य केले. सरसंघचालक मोहन भागवत खुटाड निघाले तर नाही तर तुम्ही कोणालाच सोडले नसते. कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तु्म्ही ज्या यंत्रणा आणि एजन्सीचा वापर करता, तेदेखील एक दिवस तुम्हाला कंटाळतील. तुमच्याकडे दादा आणि गुंड आहेत, असे तुम्हाला वाटते का? तुमच्याकडे गुंड असतील तर आमच्याकडेही मराठा गुंड आहेत. न्यायपालिकाही तुमच्यावर खुश नाही. रामदेव बाबा पाय वाकडे करुन शिकवत होता, त्यांची उत्पादनेही तुम्ही बंद केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. अमित शाह यांना कत्तली करायच्या आहेत का? दादागिरीने खुर्चीवर बसायचे आहे का? तुम्ही भाजपमध्ये काड्या लावल्या, नागपूरमध्ये तुम्ही काय केलंय, हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेने तुमचे राजकीय एन्काउंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून मालेगावात तुफान राडा, दोन गटांमध्ये थेट गोळीबार!
Yavatmal Truck Accident: चंद्रपूरहून Cement घेऊन येणारा ट्रक दुकानात घुसला, थरार CCTV'त कैद
Pothole Menace: पुणे-बंगळूर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, दुचाकी घसरल्याचा थरारक Video समोर
Pune Car Crash: 'हँडब्रेक ओढल्यामुळे' गाडी पिलरला धडकली, Pune तील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू
Womens World Cup Final नवी मुंबईत भारत विरुद्ध द. आफ्रिका लढत रंगणार, विश्वविजयासाठी टीम इंडिया सज्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
Embed widget