Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Manoj Jarange Maratha Morcha LIVE: आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच केलीय. मनोज जरांगे आज सकाळी मुंबईत पोहोचले आहेत.
LIVE

Background
Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच केलीय. मराठा आंदोलक आज सकाळी मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आहेत. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
Manoj Jarange Patil: मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या सीएसटी स्थानकात घोषणाबाजी
Manoj Jarange Patil: मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या सीएसटी स्थानकात घोषणाबाजी
मराठ्यांनी हलगीवर मुंबईत पोहचून जल्लोष साजरी केला
रात्रभर आरक्षणाच्या मागणीसाठी आलेलेल कार्यकर्ते सीएसटी स्थानकात झोपले
Manoj Jarange Patil: मुंबईत वाहतुकीत बदल
Manoj Jarange Patil: वाहतूक विभागाच्या हद्दीत दि.२९/०८/२०२५ रोजी संभवतः आयोजक श्री. मनोज जरांगे यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेला असुन सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथे दि.२९/०८/२०२५ रोजी येणार आहे. सदरचा मोर्चा हा बीड येथून निघून नवी मुंबई मार्गे सायन- पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेवून आझाद मैदान येथे जाणार आहे. सदर मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने तसेच सदरच्या मोर्चामधील लोक हे पायी, मोटर सायकल, मोटर कार/टेम्पो/ट्रक इत्यादी वाहनांनी येणार आहे. तरी वाहतुकीच्या आदेशाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.





















