एक्स्प्लोर

''मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं''; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर संतापले मनोज जरांगे

काही तृप्त आत्मे आमच्यातही आहेत, जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय ते बघवत नाहीत, असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजातील काही जणांवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झाला असून मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच, विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, संसदेतही खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी, आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी खासदार कोल्हेंनी केली होती. आता, यासंदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी खासदार कोल्हे व बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonavane) चांगलंच सुनावलं. 

काही तृप्त आत्मे आमच्यातही आहेत, जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय ते बघवत नाहीत, असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजातील काही जणांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणेंनी घेतलेल्या भूमिकेवरुन संताप व्यक्त केला.  तसेच, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे जेव्हा संसदेत भाषण करतात, त्यामध्ये ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागू नये. त्याचवेळी, बीडचे तुमचे खासदार बजरंग सोनवणे हेही बाक वाजवून त्याला समर्थन देतात? असा प्रश्न मनोज जरांगे यांना एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर, मनोज जरांगे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणेंवरही जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले जरांगे

मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं, एकदा मतं घेतली की जात जागी झाली त्यांची. आमच्य मराठ्यांना हेच तर कळालं नाही, आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला. तर, एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं, मग तो बदलला. 5 वर्षांसाठी त्याला वाटत असंल आता मला काही नाही. पण, आमदारकीला त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी उभा करतील ना, मराठे ते पाडतील, असे म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, एखादी चूक होत असते, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होत असते. काही चुका पोटात घेऊन माफ करावं लागतं, असेही जरांगे यांनी म्हटले.

संसद सभागृहात नेमकं काय झालं?

यंदाच्या 18 व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी संसद सभागृहात भाषण केले. त्यामध्ये, अमोल कोल्हे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरुनही भूमिका मांडली. त्यावेळी, महाराष्ट्रात जातीय जनगणना झाली पाहिजे, आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी, राष्ट्रवादीचे बीडमधील खासदार बजरंग सोनवणे यांनी बाक वाजवून आपलं समर्थन दिलं होतं. बजरंग सोनवणेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget