एक्स्प्लोर

...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

आपल्याला न्याय मिळेपर्यंत उन, वारा पाऊस सहन करायचा डगमगायच नाही. माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबाच्या वेदना जास्त महत्वाच्या आहेत.

धाराशिव : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी धनंजय मुंडेंवर (dhananjay munde) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पोलीस प्रशासनाने खुनातील आरोपींविरुद्ध मोक्का लावला आहे. पण, खंडणीच्या आरोपीवर मोक्का नसेल तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांकडून आज 7 आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती आहे. 

आपल्याला न्याय मिळेपर्यंत उन, वारा पाऊस सहन करायचा डगमगायच नाही. माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबाच्या वेदना जास्त महत्वाच्या आहेत. सगळ्या आरोपी विरुद्ध मकोका लागला अशी माहिती आली. मात्र, खंडणीतील आरोपी विरोधात मोक्का लागला नसेल तर आम्हाला तो मान्य नाही.  खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत, सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी मोर्चातून केली. खंडणी आणि खुनाचे आरोपी एकाच आहेत, सर्वांना 302 मध्ये घ्या. एकही आरोपी सुटला तर आम्ही हे राज्य बंद पाडू. जर पदावरून हटवलं नाही तर दिवसा लोकं मारेल असं धस म्हणाले, पण अण्णा आता जरं नख लागला तर कुत्र्यासारखे सालपट काढू, दगफटका केला तर सरकारचा कार्यक्रम झालाच, असे म्हणत मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंना आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

धनंजय मुंडेंना इशारा

मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत गृहमंत्री व धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडाना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच आरोपींवर आज पोलीस प्रशासनाकडून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध आज मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा

Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : अजित दादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजित दादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : अजित दादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजित दादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Embed widget