एक्स्प्लोर

Lok Sabha Result 2024: मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला , कीर्तिकरांचा संशय असलेला 'तो' व्यक्ती निघाला वायकरांचा मेव्हणा

Maharashtra Politics: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती. यामध्ये शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा विजय झाला होता. मात्र, त्यांच्या मेहुण्यामुळे रवींद्र वायकर अडचणीच येण्याची शक्यता आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी वायव्य मुंबईतील मतमोजणीवेळी सर्वाधिक चुरस दिसून आली होती. येथील अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. सुरुवातीला अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत पोस्टल मतं निर्णायक ठरल्याने रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निसटता विजय मिळवला होता. मात्र, ठाकरे गटाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे. यादरम्यान मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतांची मोजणी होत असलेल्या खोलीत एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याची माहिती समोर आली होती. अमोल कीर्तिकर यांनी या व्यक्तीचा उल्लेख करत मतमोजणी कक्षात या व्यक्तीला मोबाईल आणूनच कसा दिला, हा प्रश्न उपस्थित केला होता.

या व्यक्तीबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बोलणाऱ्या या व्यक्तीचे नाव मंगेश पंडीलकर असे आहे. पोलिसांनी तहसीलदारांच्या तक्रारीनंतर मंगेश पंडीलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा मंगेश पंडीलकर हा दुसरा तिसरा कोणीही नसून शिंदे गटाचा उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेव्हणा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वायव्य मुंबईतून निवडणूक लढवणारे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या मंगेश पंडलीकर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन न घेता तहसीलदारांची तक्रार दाखल करुन घेतली. त्यामुळे भरत शाह यांना एफआयआरची प्रत मिळालेली नाही. भरत शाह यांना याप्रकरणात साक्षीदार करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी माझ्याऐवजी तहसीलदारांची तक्रार कशी दाखल करुन घेतली. हा सगळा प्रकार संशय उत्पन्न करणारा आहे, असे भरत शाह यांनी म्हटले. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे शनिवारी सकाळी वनराई पोलीस ठाण्यापर्यंत आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांना पाहताच मंगेश पंडलीकर यांनी आपला मोर्चा आल्या पावली माघारी वळवला. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी कोणत्या गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

मोठी बातमी : अमोल कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

Amol Kirtikar : मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या 'त्या' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पण FIR कॉपी देण्यास पोलिसांचा नकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
Embed widget