एक्स्प्लोर

मोठी बातमी : अमोल कीर्तिकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

Amol Kirtikar, Mumbai North West Loksabha : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर  यांना मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातील सीसीटीव्ही देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Amol Kirtikar, Mumbai North West Loksabha : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा (Mumbai North West Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातील सीसीटीव्ही देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही उमेदवारास देणे हे कायद्यात बसत नसल्याचं कारण जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. 

अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात  शिवसेना ठाकरे गटाचे  उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता. सुरुवातीला निवडणुकीचा निकाल देत असताना  अमोल कीर्तीकर यांचा विजय जाहीर केल्यानंतर वायकरांच्या विनंतीनुसार पोस्टल मतांची फेर मतमोजणी करण्यात आली. या फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र या सगळ्या मतमोजणीमध्ये  गोंधळ झाल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांनी केला.

मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज कीर्तिकर यांनी मागितले होते

शिवाय त्यांनी मतांची फेर  मतमोजणीची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र निकालाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी  फेर मतमोजणी नाकारली. निकालाच्या चार दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासंदर्भात अमोल कीर्तिकर आणि पत्र दिले होते.  मतमोजणी केंद्रामध्ये  गोंधळ झाल्याचे सांगत 4 जून रोजी दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज कीर्तिकर यांनी मागितले होते. आता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. 

 लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर  कोर्टात जाण्याची तयारीत

 सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकरांसमोर आणली असल्याची माहिती आहे.  निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी  असमर्थता दर्शवली. त्यामुळे या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई  लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर  कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. अमोल कीर्तीकर यांनी या सगळ्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Amol Kirtikar : मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या 'त्या' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पण FIR कॉपी देण्यास पोलिसांचा नकार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget