Mallikarjun Kharge: सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या आग्रहामुळे काँग्रेस अध्यक्षपद; मल्लिकार्जुन खर्गेंचा गौप्यस्फोट
Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी बऱ्याच गोष्टींवर खुलासा केला आहे. खर्गेंनी म्हटलंय की, काँग्रेसने जर संविधान आणि लोकशाहीचं रक्षण केलं नसतं तर मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते.
Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी स्वत: पक्षप्रमुख होण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महिला काँग्रेसच्या एका कार्यक्रमात खर्गे म्हणाले, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सांगण्यावरून मला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं. यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचं रक्षण केलं नसतं तर मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असं ते म्हटले.
'मणिपूर जळत आहे, तरी पंतप्रधान तिथे गेले नाही'
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मणिपूर प्रकरणावरुन देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. खर्गे म्हणाले, पंतप्रधान मोदी संसदेत फक्त स्वतःबद्दल बोलतात. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर त्यांना आठवत नाहीत. मणिपूर जळत आहे पण पंतप्रधान तिथे डोकावायलाही गेले नाही. पुढे काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणावरही निशाणा साधला आणि म्हणाले की, "पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर सांगितलं की पुढच्या वेळी ते पुन्हा इथे ध्वजारोहण करतील. मी म्हणालो, ते झेंडा नक्कीच फडकावतील पण त्यांच्या घरी आणि अमित शहा त्यांच्या घरी पत्नीसह फडकवतील."
'महिलांनी ठरवल्यास भाजपचं सरकार हटवू शकतात'
खर्गे म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) भारताला जोडण्याचं काम करतात, तर पंतप्रधान मोदी ते तोडण्याचं काम करतात. खर्गे पुढे म्हणाले, पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत, महिलांनी निर्धार केला तर त्या भाजपचे सरकार हटवू शकतात. तर बांगलादेश युद्धाचा उल्लेख करत काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले, इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला, पाकिस्तानच्या एक लाख लोकांना तुरुंगात टाकलं. मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) भारतातील जनतेची फक्त दिशाभूल करतात.
खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, (पंतप्रधान मोदी) आजकाल भाऊ-बहिणींनो (भाईयों-बहनों) म्हणनं सोडलं असून आता ते कुटुंबातील सदस्य (मेरे परिवारजन) बोलत आहेत. इंडिया आघाडीचे लोक काय करत आहेत हे ते बोलत आहेत! विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट केलं जात आहे, पण काँग्रेस घाबरत नाही, असंही खर्गे पुढे म्हणाले. भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस सक्षम असल्याचं मल्लिकार्जुन खर्गेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
हेही वाचा: