एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Winter Session 2024: हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर; विरोधी पक्षनेत्याचा बंगलाही तयार, मात्र तिथं राहणार कोण?

Maharashtra Winter Session 2024: नागपुरात डिसेंबरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन होईल. मात्र, रविभवन परिसरातील 22 व 23 नंबरच्याया कॉटेजमध्ये आता राहणार कोण, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.

Maharashtra Winter Session 2024 नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सरकारस्थापनेच्या आधीच हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्या आहेत. येत्या 16 डिसेंबर ते 24 डिसेंबरमध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसनव्यवस्था असणार आहे. यासह अधिकवेशनाच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. हे अपयश एवढे आहे की यातील एकाही घटक पक्षाला 29 चा आकडा गाठता आला नाही. त्याचमुळे विरोधी पक्षनेता हे पदही मिळणार नाही. नागपुरात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होईल. मात्र, रविभवन परिसरातील 22 व 23 नंबरच्याया कॉटेजमध्ये आता राहणार कोण, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.

विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार?

हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्याने त्या अनुषंगाने नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. दरम्यान, अधिवेशनात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार? हा प्रश्न या निमित्याने आता विचारला जाऊ लागला आहे. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधीपक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याचे सजावटीचे काम सुरू आहे. मात्र आवश्यक असलेले संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बंगल्याच्या सजावटीचे काम सुरू आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला कोणाला मिळणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

कधी होणार हिवाळी अधिवेशन?

राज्यातील नवनिर्वाचित २८८ आमदारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकार स्थापन न झाल्याने २८८ आमदारांना एकत्र बोलवत सत्ता स्थापनेचं एक अधिवेशन मुंबईला होणार आहे. यासाठी २८८ पैकी ७८ हे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले आहे. त्यात भाजपचे ३३, शिंदे गट शिवसेना १४, अजित पवार गट राष्ट्रवादी ८, ठाकरे शिवसेना १०, कांग्रेस ६, शरद पवार गट राष्ट्रवादी ४ व इतर ३ आमदारांचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहितीABP Majha Headlines :  11 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Embed widget