एक्स्प्लोर

नवाब मलिक आमचे सहकारी, शिवसेना आणि भाजपला मलिकांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा : प्रफुल्ल पटेल 

नवाब मलिक यांनी कुठला गुन्हा केला असं कोर्टात सिद्ध झालं नाही. आम्ही त्यांना तिकीट दिली आहे. भाजप व शिवसेनेला त्यांची मदत करायची नसेल ती त्यांची इच्छा असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांन व्यक्त केलं. 

Praful Patel : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठं वादंग पाहायला मिळत आहे. भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार देखील दिला आहे. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारले असता पटेल यांनी सांगितले की, नवाब मलिक आमचे सहकारी आहेत. आमदार मंत्री सर्व पदावर ते राहिले आहेत. तसेच त्यांनी कुठलाही गुन्हा केला आहे असं कोर्टात सिद्ध झालेला नाही. आम्ही त्यांना तिकीट दिली आहे. भाजप व शिवसेनेला त्यांची मदत करायची नसेल किंवा दुसरा उमेदवार द्यायचे असेल तर ती त्यांची इच्छा असल्याचे पटेल म्हणाले. 

दरम्यान, येथील जागेमुळं महायुतीच्या इतर दुसऱ्या जागांवर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत अशी सावध भूमिका देखील यावेळी प्रफुल पटेलांनी घेतली आहे. ते गोंदिया येथे माध्यमांशी बोलत होते.  अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री मंत्री नवाब मलिक माणखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार यांनी तिकीट दिलं आहे. मात्र, महायुतीमधूनच नवाब मलिक यांना विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केलं आहे. मात्र, दुसरीकडे सना मलिक यांना अनुशक्तीनगरमध्ये पाठिंबा देण्यात आला आहे. 

दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीचा प्रचार करणार नाही, भाजपची भूमिका

भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही' असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही', असे आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटान नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुलं मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

Nawab Malik : काही लोक सांगतात शिंदे आणि पवार साहेबांचं काहीतरी सुरुय, निकालानंतर कोण कोणासोबत जाईल काही सांगता येत नाही : नवाब मलिक

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget