एक्स्प्लोर

चंद्रपूर जिल्ह्यात बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस; तुळजापुरात बोगस नोंदणी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा

चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात 6 हजार 853 बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. तर तुळजापूर मतदारसंघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 150 मतदारसंघ ठरवून एका ॲपच्या माध्यमातून दहा हजार मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) केला आहे. हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, ज्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे ते मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने दिला आहे. असे असताना राज्याच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 853 बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. तर दुसरीकडे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस  नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात तब्बल 6, 853 बनावट नावं 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 853 बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. मतदारांच्या ऑनलाईन नोंदणी दरम्यान प्रशासनाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे ही अर्जदारांची चूक आहे की संघटित कृत्य? याची आता चौकशी होणार असून या प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजुरा पोलीस येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून Voter Helpline App किंवा  NVSP Portal च्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र, काही लोकांनी या सुविधेचा गैरवापर करून बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. प्रशासनाकडून या बाबत चौकशी सुरु असतांना कोरपना तालुक्यातील लखमापूर गावातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नावं सामील करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून आलय. 

तुळजापूर मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज, 40 जणांवर पोलिसात गुन्हा

दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. मात्र या बोगस मतदार नोंदणी रॅकेटच्या मास्टर माईंड कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मतदार नोंदणी  अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला आहे.  

तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक आणि वेळ एकसमान असल्याचेही दिसून आले आहे. भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.  मतदान नोंदणीसाठी फॉर्म 6 भरताना  स्थानिक नागरिक असल्याचे जोडलेले पुरावे बोगस आहेत. दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रियाMaharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवारMaharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणारAmritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार? फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
Embed widget