एक्स्प्लोर

solapur: मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 

सध्या शरद पवार यांच्याकडे तिकिटाची मागणी करणाऱ्या त भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय शिरसागर , माजी आमदार रमेश कदम आणि राजू खरे ही तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत.

Vidhansabha election: मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सध्या राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील या वादाने राज्यभर गाजला आहे. अजितदादांनी राजन पाटील यांना खुश करण्यासाठी थेट आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यालाच श्वानाची उपमा देऊन राजन धक्का दिला होता. मोहोळ मध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत तात्या माने हे असून येथे बदल घडवण्यासाठी यावेळी राजू खरे हा नवीन चेहरा शरद पवार देण्याच्या तयारीत आहेत. राजन पाटील विरुद्ध राजन पाटील विरोधक असं थेट समीकरण सध्या मोहोळ मध्ये असून राजन पाटलांना वाढता विरोध हा यावेळी निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. मोहोळ तहसील चे उपकार्यालय अनगर येथे हलवल्यानेच मोहोळ मध्ये तीव्र असंतोष होता आणि यातूनच राजन पाटलांना सध्या टोकाचा विरोध सुरू झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा मोहोळची जागा जिंकण्यासाठी विद्यमान आमदार आणि राजन पाटलांचे स्नेही यशवंत तात्या माने यांनाच तिकीट देण्याचे ठरविले आहे. 

यामुळे सध्या शरद पवार यांच्याकडे तिकिटाची मागणी करणाऱ्या त भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय शिरसागर , माजी आमदार रमेश कदम आणि राजू खरे ही तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. संजय क्षीरसागर यांनी राजन पाटील यांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवून यापूर्वीही पराभूत झाले होते. या मतदारसंघातून दुसरी इच्छुक असणारे माजी आमदार रमेश कदम हे अनेक वेळा वादग्रस्त ठरले असून त्यांच्यावर काही केसेस सुरू असल्याने शरद पवार नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत . यातूनच मूळ पंढरपूरचे असणारे आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले उद्योगपती राजू खरे यांचे नाव पुढे आले आहे. 

कोण आहेत राजू खरे?

युवा सेनेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे राजू खरे हे नंतर उद्योगानिमित्त मुंबईत गेले आणि तेथेच स्थायिक झाले . गेल्या वेळी विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळेला त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी धीर न सोडता याच मतदारसंघात रस्ते ,पाणी, आरोग्य ,शिक्षण अशा क्षेत्रात काम करत राहिले. दुष्काळा दरम्यान खरे यांनी मोहोळ शहर मोहोळ ग्रामीण आणि उत्तर सोलापूर या भागात स्वखर्चाने पाणी टँकर सुरू केले होते. याच सोबत मागील त्याला रस्ता मागील त्याला बोरवेल अशा रीतीने लोकांशी संपर्क वाढवत त्यांनी विधानसभेसाठी पेरणी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात खरे यांनी अनेक शाळांना मदत करताना विविध कंपन्याचे सीएसआर फंड देऊ केले होते. मोहोळ परिसरातील आजारी रुग्णांना रोख स्वरूपाची मदत करीत त्यांनी गावोगावी आपली ओळख निर्माण केली होती. सण उत्सव काळात विविध तरुण मंडळांनाही ताकद दिल्याने सध्या खरे यांची तरुणात मोठी क्रेझ तयार झालेली आहे. 

मोहोळ मतदारसंघात साधला जाईल जातीय समिकरणाचा तोल?

मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अशा तीन तालुक्यांचा मिळून बनला असून गेल्या वेळेला विजयी झालेले यशवंत माने यांना साडेसात हजाराचा निर्णय आघाडी ही पंढरपूर तालुक्यातून मिळाली होती. मोहोळ मतदार संघात जवळपास एक लाख 80 हजार एवढे मतदान मोहोळ शहर व तालुक्याचे असून पंढरपूरचे 60000 तर उत्तर सोलापूरचे 85000 मतदान आहे. या मतदारसंघात मोहोळ तालुक्यातील राजन पाटील गट विरुद्ध सर्व असे चित्र सध्या तयार झाले असून उत्तर सोलापूर मध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची ताकद आहे. अशा परिस्थितीत विद्यमान आमदारांना पराभूत करण्यासाठी राजन पाटील यांच्या विरोधात असलेली लाट आणि पंढरपूर व उत्तर सोलापूर या मतदारसंघाची गोळाबेरीज करून येथे विजय मिळवणे शक्य असल्याचे गणित सध्या शरद पवार मांडत आहेत. यासाठीच राखीव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच नव बौद्ध असणाऱ्या राजू खरे यांना उमेदवारी दिल्यास जातीय समीकरणाचा समतोल साधता येणार आहे. यातूनच पंढरपूर तालुक्यात असलेले मतदान खरे यांना फायदेशीर ठरणार असून काका साठे गटाकडून देखील खरे यांचे नाव पुढे येत असल्याने राजू खरे यांना उमेदवारी दिल्यास आमदार माने यांचा पराभव चांगल्या मताने करता येऊ शकेल हे गणित शरद पवार गट मांडत आहे. 
     

मोहोळला नवा चेहरा देण्याचे पवारांचे आडाखे

राजन पाटलांचा पारंपारिक विरोधक म्हणून क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जात असले तरी क्षीरसागर यांच्याकडे खाटीक धनगर हे प्रमाणपत्र आहे. अशाच प्रमाणपत्रावर माळशिरस येथून उत्तम जानकर देखील निवडणूक लढणार असल्याने या वेळेला मोहोळ मधून नवीन चेहरा देण्याचे आडाखे शरद पवार  गटाकडून आखण्यात येत आहेत. माजी आमदार रमेश कदम हे जरी उमेदवारी मागत असले तरी त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याची चर्चा आहे. याशिवाय शरद पवारांचे जुने सहकारी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजीत व कन्या कोमल हे दोघेही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. अशावेळी शरद पवार यांना मोहोळ साठी भरपूर पर्याय असले तरी नव बौद्ध समाजाला खुश करण्यासाठी आणि नवीन चेहरा उतरवण्यासाठी राजू खरे यांच्या नावाला काका साठे गट पुढे करीत असल्याची चर्चा आहे. याचबरोबर राजन पाटलांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले आणि सध्या अजित पवार गटाचा राजीनामा दिलेले उमेश पाटील यांचेही मत शरद पवार आजमावून पाहत असून काही झाले तरी मोहोळची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटच लढवणार या भूमिकेवर पक्ष ठाम आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाकडूनही जोर धरला जात असला तरी गेल्या वेळेचा आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका शरद पवार गटाकडून मांडण्यात आल्याने ही जागा तुतारीसाठीच सुटणार हे आता नक्की झालेले आहे. गेल्या वेळेला आमदार यशवंत माने यांना जेवढी आघाडी राजन पाटील यांनी मोहोळ मधून मिळवून दिली होती तेवढीच आघाडी पंढरपूर तालुक्याने दिल्याने ही उमेदवारी पंढरपूर तालुक्याला देण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झाले नसले तरी येथील उमेदवार तुतारीचाच असणार असून या स्पर्धेत नवीन चेहरा उतरवत राखीव जागेवर मागासवर्गीय उमेदवारच देण्याचे गणित शरद पवार यांनी मांडले आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यशJaved Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 27 February 2025Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश, गुनाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना साथ
मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
Embed widget