(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election 2024 : संतोष चौधरी पवारांची साथ देतील, जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Lok Sabha Election 2024 : नागपूर, रामटेकच्या EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित, स्ट्रॅांग रुममला तीन स्तरीय 24 तास सुरक्षा
Lok Sabha Election 2024 : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पाडल्यानंतर, आता सर्व EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याय. कळमना APMC मार्केटमध्ये 4 जूनपर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आल्याय. या स्ट्रॅांग रुममला तीन स्तरीय सुरक्षा असून, 24 तास केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस तैनात आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील 4510मतदान केंद्रांवरील EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याय.
Ramdas Kadam : राजकारण अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेत - रामदास कदम
मंडणगड : राजकारण अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेत. नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जातेय. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत, त्यांनी मराठी माणसाला फसवलं आहे. मला फसवलं, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, असं म्हणत रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उध्दव ठाकरेंची नस नस मला माहितेय. सूर्यकांत दळवी आणि माझे मतभेद होते,पण पाच वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही.
बहुजन विकास आघाडी स्वबळावर पालघर लोकसभा लढणार
Chhagan Bhujbal News : अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज
नाशिक : छगन भुजबळाना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने भुजबळ अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्त नाराज झालेत. समता परिषदेकडून त्यामुळे महायुतीच्या भुमिकेच्या निषेधाचे पत्रक काढण्यात आलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी छगन भुजबळांना तिकीट देऊ केले होते मात्र राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी छगन भुजबळांची उमेदवारी हाणून पाडल्याचा आरोप समता परिषदेच्या कार्यकर्तानी केलाय.
Navi Mumbai CIDCO : सिडकोची घरे लागूनही चार वर्ष झाला ताबा मिळत नसल्याने सिडकोसमोर आंदोलन
Navi Mumbai : तळोजा सेक्टर ३४ आणि ३६ मध्ये २०१९ साली सिडकोने लॉटरी काढली. मात्र पाच वर्षे होत आले अजूनही सदनिका ताब्यात मिळत नाही. त्यात सिडकोने सदनिका लाभार्त्यांकडून विलंब शुल्क देखील आकारल्यामुळे लाभधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. सिडकोने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात तीव्र पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा सिडको लाभार्थ्यांनी दिला आहे.