Maharashtra Lok Sabha Election Result : सकाळी 10 वाजेपर्यंत 10 दिग्गजांना दहा धक्के! नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उदयनराजे पिछाडीवर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीमध्ये जोरदार लढत असल्याचं दिसून येतंय.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यातल्या महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत असून सकाळी 10 वाजेपर्यंतचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं दिसून आलं. राज्यातील अनेक दिग्गजांना सकाळी 10 वाजेपर्यंत मोठे धक्के बसल्याचं दिसून आलं. त्यामध्ये सुनेत्रा पवार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुडे, उदयनराजे आणि नवनीत राणा हे दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून आलं.
राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
कोणत्या दिग्गजांना धक्का?
नवनीत राणा- भाजप 3,322 मतांनी पिछाडीवर
नारायण राणे - भाजप
सुधीर मुनगंटीवार- भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
सुनेत्रा पवार- राष्ट्रवादी
पंकजा मुंडे - भाजप
उदयनराजे- भाजप 27 हजार मतांनी पिछाडीवर
संजयकाका पाटील - भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
राम सातपुते- भाजप
रणजीत निंबाळकर- माढा
आढळराव पाटील - राष्ट्रवादी
रवींद्र धंगेकर- काँग्रेस
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 10 पैकी 10 जागांवर आघाडी
सकाळी 10 वाजेपर्यंतचा कल हाती आल्यानंतर त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 पैकी 10 उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये चौथ्या फेरीअखेर सुप्रिया सुळे या 19,000 मतांनी आघाडी घेतली होती. तर साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे हे 27 हजार मतांनी आघाडीवर होते.
त्याचवेळी सकाळी 10 वाजेपर्यंत देशभरात भाजपप्रणित एनडीए 273 जागांवर आघाडीवर होते, तर विरोधकांची इंडिया आघाडी ही 246 जागांवर आघाडीवर होती. त्