Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा? काँग्रेस की भाजप, राज्यातील सर्वात मोठा पक्ष कोणता?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 पैकी 8 जागा जिंकल्या असून दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रायगडच्या रूपात फक्त एकच जागा मिळाली आहे.
मुंबई : राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.
राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून त्यामध्ये 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या असून त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे.
महायुतीला 17 जागा
गेल्या वेळी 42 जागा मिळवणाऱ्या भाजप-शिवसेना युतीने यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण यावेळी त्यांना फक्त 18 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पवारांची जादू
पश्चिम महाराष्ट्रातील यंदाची लढत निर्णायक होती. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर जनता अजित दादांना साथ देते की शरद पवारांसोबतच राहते हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यापैकी बारामतीमधील विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर असल्याचं पहायला मिळालं.
महाराष्ट्रातील पक्षांचा स्ट्राईक रेट किती आहे ते पाहूयात,
भाजप
28 पैकी 9
स्ट्राईक रेट - 33.33 टक्के
-----
शिवसेना शिंदे गट
15 पैकी 7 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 46.30 टक्के
-----
राष्ट्रवादी (अजित पवार)
4 पैकी 1 जिंकली
स्ट्राईक रेट - 25 टक्के
----
ठाकरे गट
21 पैकी 9 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 42.85 टक्के
----
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
10 पैकी 8 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 80 टक्के
-----
काँग्रेस
17 पैकी 13 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 76.47 टक्के
बारामतीमध्ये शरद पवारांची बाजी
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राउंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय. तर पराभवानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं.
ही बातमी वाचा :