Lok Sabha Election Result : कल्याण काळे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते यांच्यासह राज्यातील 17 जायंट किलर्स, ज्यांनी बदललं राजकारण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : सांगलीतून विशाल पाटील, नगरमधून निलेश लंके तर भिवंडीमधून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी त्यांच्या विरोधकांचा पराभव केला.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महायुतीला मात्र 17 जागांवर समाधान मानावं लागलं असून एका अपक्षाने बाजी मारली.
राज्यातील यंदाची निवडणूक गाजली ती आरोप प्रत्यारोपाने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. अशा परिस्थितीत झालेल्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ आणि त्यातील उमेदवार चांगलेच चर्चेत आले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत तर काही उमेदवार हे जायंट किलर ठरले आणि त्यांनी समोरच्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या उमेदवारांना पाणी पाजलं.
राज्यातील जायंट किलर्स
1. विशाल पाटील, सांगली – संजयकाका पाटील (विद्यमान खासदार)
2. कल्याण काळे, जालना – रावसाहेब दानवे (विद्यमान खासदार)
3. भास्कर भगरे, दिंडोरी – भारती पवार (विद्यमान खासदार)
4. निलेश लंके, अहमदनगर – सुजय विखे पाटील (विद्यमान खासदार)
5. गोवाल पाडवी, नंदुरबार – हीना गावित (विद्यमान खासदार)
6. बळवंत वानखेडे, अमरावती – नवनीत राणा (विद्यमान खासदार)
7. सुरेश म्हात्रे, भिवंडी – कपिल पाटील (विद्यमान खासदार)
8. अमर काळे, वर्धा – रामदास तडस (विद्यमान खासदार)
9. नरेश म्हस्के, ठाणे – राजन विचारे (विद्यमान खासदार)
10. नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत (विद्यमान खासदार)
11. प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजपचे मंत्री)
12. वसंतराव चव्हाण, नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (विद्यमान खासदार)
13. राजाभाऊ वाजे, नाशिक – हेमंत गोडसे (विद्यमान खासदार)
14. धैर्यशील मोहिते पाटील, माढा – रणजीतसिंग निंबाळकर (विद्यमान खासदार)
15. वर्षा गायकवाड, उत्तर-मध्य मुंबई – उज्ज्वल निकम (स्टार उमेदवार)
16. शोभा बच्छाव, धुळे – सुभाष भामरे (विद्यमान खासदार)
17. शामकुमार बर्वे, रामटेक – राजू पारवे (बर्वेंच्या पत्नीची उमेदवारी अडचणीत)
राज्यात महाविकास आघाडीने 30 जागांवर आघाडी घेतली असून महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. तर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून सांगलीतून बाजी मारली. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला वैयक्तिक मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. भाजपला यावेळी फक्त 10 जागांवर विजय मिळाला आहे.
ही बातमी वाचा: