एक्स्प्लोर

मोठी बातमी : आता विरोधी पक्षनेत्यासाठी दीड-दीड वर्षाच फॉर्म्युला, पवारांचा आग्रह, काँग्रेसचा विरोध, ठाकरेंची भूमिका काय?

Maharashtra Leader of Opposition Postion: राज्यात विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्च्या खालीच आहेत, त्या जागेवर कोणत्या पक्षांची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं आहे.

Maharashtra Leader of Opposition Postion: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या, मोठ्या संख्येने महायुतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामीच दिसून येत आहे. अशातच विरोधी पक्षनेतेपदाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागणार यापेक्षा जास्त ते पद महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या, असं असतानाच आता महाविकास आघाडीतील तीन पक्षांसाठी दिड-दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग?

महायुतीतील तीन पक्षांसाठी दिड-दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला असल्याच्या चर्चा आहेत. दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही, असल्याची माहिती आहे. दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीतून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान होणार असल्याची चर्चा आहे. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?

विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 काँग्रेसकडे 15,  तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत, आता हे अपुरं संख्याबळ पाहता. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाही, अशी चर्चा होती. 

महाविकास आघाडीतील पक्षांकडे किती जागा?

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये 50 जागांचा आकडाही पार करता आला नाही. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंना 20 तर, शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळाला आहे.तर दुसरीकडे राज्यात भाजपने 2024 मध्ये सर्वात जास्त जागा मिळवल्या आहेत. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर, शिंदेसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळवला आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Babanrao Taywade On Manoj Jarnge : मनोज जरांगेंची सर्वात मोठी ताकदच त्यांच्या मुंबईच्या आंदोलनातील अडथळा ठरणार? बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण
मनोज जरांगेंची सर्वात मोठी ताकदच त्यांच्या मुंबईच्या आंदोलनातील अडथळा ठरणार? बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण
Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य
'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Embed widget