Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

Background
राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, कराड यांच्या अटकेनंतर देशमुख हत्याप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात पारा चांगलाच घसरला असून सर्वदूर थंडीचा कडाका वाडला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
1. खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, शंभर दिवसांचा रोड मॅप आणि प्रस्तावित एसटी भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित
2. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास, सीआयडीचा स्वतंत्र तपास सुरूच राहणार
3. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटोपून आज नाशकात परतणार, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम
4. संभाजीनगरात मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अब्दुल सत्तार यांचं शक्तिप्रदर्शन...विश्वास असेपर्यंत शिंदेंना साथ, विश्वास संपल्यानंतर 'निर्णय', सत्तारांचा थेट इशारा...
5. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे रडारवर, 12 यूझर्सविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई
Sindhudurg Floating Jetty : मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावर राज्यातील पहिली तरंगती जेटी
Sindhudurg News : महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी सिंधुदुर्गातील मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावर कार्यान्वित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि स्कुबा डायव्हिंगसाठी ही नवीन तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे किल्यावर जाण्यासाठी मालवण बंदर वरून लागणारा वेळ कमी करण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन तरंगती जेटी वरून 5 मिनिटात सिंधुदुर्ग किल्यावर जाता येणार आहे. तसेच, पर्यटन व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे, याबाबत माहिती बंदर विभागाचे अधिकारी अनंत गोसावी यांनी दिली आहे.
Sindhudurg Cashew : केंद्राच्या एक जिल्हा एक उत्पादनात सिंधुदुर्गचा काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश
Sindhudurg News : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे. काजू आणि काजू उत्पादनाबाबत तसेच काजू प्रक्रियाबाबत "वेंगुर्ला काजू" यांस 2018 मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72000 हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड आहे. देशामध्ये काजू प्रक्रियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. त्यामुळे केंद्राच्या एक जिल्हा एक उत्पादनात सिंधुदुर्गचा काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे.























