Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरुपात एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेण्यात येणार आहे. संक्षिप्त बातम्या झटपट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा...
LIVE

Background
सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रखर प्रवर्तक आणि असंघटित मजुरांसाठी आयुष्य झोकून देणारे नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांचे 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एका पर्वाचा शेवट होय. हमाल, मजूर, तळागाळातील कष्टकरी, लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत (Hamal Panchayat), अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएमविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन यासाठी त्यांना ओळखलं जातं. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष आणि परिवर्तन यांचा प्रवास होय.
Who Was Baba Adhav : कोण होते बाबा आढाव?
बाबासाहेब पांडूरंग आढाव म्हणजे बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर, पण मनाने पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. ते लहान असताना त्यांचे मामा त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या बैठकींना घेऊन जात. राष्ट्र सेवा दल समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक रचनेत मूलगामी बदल घडविण्याची चळवळ राबवत होते. याच चळवळीने बाबा आढावांच्या विचारांची पायाभरणी केली.
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही (Congress) राजकीय हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, पंजाबमधील काँग्रेसमध्ये चांगलाच भूकंप झाल्याचं पाहायला मिळत असून काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले आहे. नवज्योत कौर सिद्धू या काँग्रेसच्या माजी आमदार असून काँग्रेस नेते आणि क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय नसल्याने आणि पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून नवज्योत कौर सिद्धू यांचे निलंबन करण्यात आलं.
नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला होता. त्यानुसार, पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आणि तिकीट देण्यासाठी कोट्यवधि रुपयांची डील केली जाते. 6 डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ सुरू झाला होता. राजकीय वर्तुळात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले, तर विरोधकांच्या हाती आयतं कोलितही सापडलं. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने 2 दिवसांत हा निर्णय घेतला आहे.
खाऊचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमाला नागरिकांनी दिला बेदम चोप
कोल्हापूर
खाऊचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडून दिला बेदम चोप
कोल्हापूर मधील कात्यायनी गिरगाव रस्त्यावरील घटना
मुलीला एकटं पाहून संबंधित तरुणाने केला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
मात्र मुलीने आरडाओरड केल्याने मोठा अनर्थ टळला
आठवडाभरापूर्वीच याच परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा झाला होता प्रयत्न
अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी पाच दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ
अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी पाच दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ
अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिली पाच दिवसांची मुदतवाढ
सर्व महानगरपालिका आयुक्तांकडून मतदार यादी जाहीर करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची करण्यात आली होती मागणी
या मागणीचा विचार करून आयोगाने अंतिम यादी जाहीर करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ केल्याची माहिती























