एक्स्प्लोर

BJP Candidate List : नाशिकमध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांना लॉटरी, मात्र देवयानी फरांदे वेटींगवर, नेमकं काय घडतंय?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय जनता पक्षाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या नावाचा समावेश  पहिल्या यादीत करण्यात आले नाही.   

नाशिक जिल्ह्यात चार विद्यमान आमदारांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे (Seema Hiray), नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले (Rahul Dhikle), चांदवडमधून डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher), तर बागलाणमधून दिलीप बोरसे  (Dilip Borse) यांना भाजपकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. 

देवयानी फरांदे वेटिंगवर

तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर आहेत. देवयानी फरांदे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. तर भाजपची दुसरी यादी काही तासातच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांना स्थान मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

हिरे, आहेर यांना पुन्हा संधी 

नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना तर चांदवडमधून राहुल आहेर यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर हे चांदवड-देवळा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. केदा आहेर यांच्यासाठी राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली होती. राहुल आहेर यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने केदा आहेर हे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नाशिक पश्चिममधून देखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे हे नेते नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!

Maharashtra Vidhansabha election : मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Embed widget