(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Election 2024: इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजपची डोकेदुखी वाढली, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट
विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पेशकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर राज्यात आता राजकीय हलचालींना वेग आला आहे. दरम्यान, भाजपसह इतर सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून आता उमेदवारी अर्जावरून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने पहिल्या यादीत ९९ जणांच्या नावांची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nashik West Constituency) एक नवाच ट्विस्ट आला आहे.
नुकतेच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिनकर पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सीमा हिरे यांच्या उमेदवारीला दिनकर पाटील यांनी विरोध केला आहे. विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पेशकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.
आगे आगे देखो होता है क्या म्हणत केला दावा
आगे आगे देखो होता है क्या। असे म्हणत पेशकार यांनी आपल्यालाच पक्षाचा एबी फॉर्म मिळण्याचा दावा केला आहे. एकीकडे प्रदिप पेशकार अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे माजी सभागृह नेता दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेत बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छूकांच्या वाढत्या संख्येमुळं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
सीमा हिरेंच्या उमेदवारीवरून नाराजी
विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पेशकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. नाशिक पश्चिम च्या उमेदवारी बाबतीत पुनर्विचार होईल असा प्रदीप पेशकार यांना विश्वास असल्याचे सांगितले आहे. सीमा हिरे यांच्या उमेदवारीला दिनकर पाटील यांनी विरोध केला आहे. निर्धार मेळावा घेत दिनकर पाटील यांनी उमेदवारीवर ठाम असल्याचं दाखवून दिलं आहे. हे वय थांबायचे नाही लढायचे आहे. भाजप पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढली तरी निर्णय मागे घेणार नसल्याची भूमिका दिनकर पाटील यांनी घेतली आहे.लोकसभेला थांबलो मात्र विधानसभेला थांबणार नाही असं पाटील म्हणाले. दिनकर पाटील यांच्या उमेदवारीने सीमा हिरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.
हेही वाचा: