![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
BJP : मुख्यमंत्री, पंतप्रधान केलं तरी थांबणार नाही, दिनकर पाटील यांची आक्रमक भूमिका, सीमा हिरेंच्या उमेदवारीला विरोध, भाजपची डोकेदुखी वाढणार?
Dinkar Patil : भाजपनं पहिल्या यादीत 99 जणांच्या नावांची घोषणा केली होती. त्यामध्ये नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिनकर पाटील आक्रमक झालेत.
![BJP : मुख्यमंत्री, पंतप्रधान केलं तरी थांबणार नाही, दिनकर पाटील यांची आक्रमक भूमिका, सीमा हिरेंच्या उमेदवारीला विरोध, भाजपची डोकेदुखी वाढणार? Maharashtra Assembly Election 2024 Dinkar Patil said he will contest from Nashik West warning to BJP over Seema Hiray BJP : मुख्यमंत्री, पंतप्रधान केलं तरी थांबणार नाही, दिनकर पाटील यांची आक्रमक भूमिका, सीमा हिरेंच्या उमेदवारीला विरोध, भाजपची डोकेदुखी वाढणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/3199f19a317eb5875611da6d3a2ebfea1729605367830989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Election 2024 नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिनकर पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सीमा हिरे यांच्या उमेदवारीला दिनकर पाटील यांनी विरोध केला आहे. निर्धार मेळावा घेत दिनकर पाटील यांनी उमेदवारीवर ठाम असल्याचं दाखवून दिलं आहे.हे वय थांबायचे नाही लढायचे आहे. भाजप पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढली तरी निर्णय मागे घेणार नसल्याची भूमिका दिनकर पाटील यांनी घेतली आहे.लोकसभेला थांबलो मात्र विधानसभेला थांबणार नाही असं पाटील म्हणाले. दिनकर पाटील यांच्या उमेदवारीने सीमा हिरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.
दिनकर पाटील निर्धार मेळाव्यात म्हणाले की,35 वर्ष काँग्रेस आणि गेल्या 11 वर्षांपासून भाजपमध्ये काम करतोय. नगरसेवक म्हणून तुमच्या आशीर्वादाने काम करतोय, अद्याप चुकीचं काम केले नाही. आज 20 नगरसेवक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहेत. मला सभापतीपद, विधानसभा, महापौर शब्द देऊन संधी दिली गेली नाही. मागच्या विधासभेला सीमा हिरे यांना निवडून द्या सांगितलं तेव्हा 9 हजार मतांचे लीड दिले आणि त्या निवडून आल्या, असं दिनकर पाटील म्हणाले.
लोकसभेला हेमंत गोडसे निवडून येणार नाहीत हे सांगितले होते. मला संधी न देता पुन्हा गोडसेंना तिकीट दिले. गोडसेंचा पराभव झाला अन् एक जागा गेली. माझ्या सोबत सर्व जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आहे, असं दिनकर पाटील यांनी सांगितलं.
आमदार म्हणून दहा वर्षात सीमा हिरे यांचं एकही ठोस काम नाही. संभामांडप आणि खेळणे बसवणे हे त्याचं काम, खेळणं बसवून खेळ करणे हेच काम त्यांनी केले, असा आरोप दिनकर पाटील यांनी केला. मला जर गर्दी करायला सांगितलं असत तर मी नाशिकचे संभाजी स्टेडियम भरवले असते. पक्षाला हा कार्यक्रम घेताना 20 कोटी खर्च करावे लागले असते. महिला या 300 रुपये घेतल्या शिवाय आल्या नसत्या, पुरुष दारू प्यायला शिवाय आले नसते, असं देखील दिनकर पाटील म्हणाले.
सीमा हिरे पडणार, दिनकर पाटील यांचा दावा
आज पण सांगतो मी सर्व्हे केला आहे आणि त्यात सीमा हिरे पडणार आणि मी तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार असं दिनकर पाटील म्हणाले. माझा आज पण प्रचार सुरू आहे, हे झोपेत राहणार असं पाटील म्हणाले. पक्षाने आज पण विचार करावा सीमा हिरे यांचा निर्णय मागे घेऊन मला एबी फॉर्म द्यावा अन्यथा जिल्ह्यात परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील पाटील यांनी दिला.
मुख्यमंत्री, पंतप्रधान केलं तरी माघार नाही : दिनकर पाटील
सगळ्यांचे पैसे घ्या आणि मतदार मलाच करा, असं आवाहन दिनकर पाटील यांनी केलं. माझ्या सोबत अनेक पक्षांचे लोक आहेत, कोण आहेत ते मी सांगणार नाही. मला रोजगार संधी उपलब्ध करून द्यायचे आहे, मोठी इंडस्ट्री आणायची आहे. छोटे काम माझे नगरसेवक करतील. मी लवकरच तुम्हाला सांगेल अर्ज दाखल केव्हा करायचं आहे.मी तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे. सगळ्यांनी कामाला लागा आता थांबायचे नाही. मला आता पक्ष सांगेल मुख्यमंत्री करतो तरी मी आता थंबणार नाही आता पंतप्रधान केले तरी माघार नाही.
नाशिक पश्चिममध्ये सांगली पॅटर्न राबवा, तिकडं विशाल पाटील आणि इकडं दिनकर पाटील असं त्यांनी म्हटलं. काही सुपाऱ्या घेऊन उमेदवारी करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सर्वांनी आता फक्त मला संधी द्या, असं दिनकर पाटील म्हणाले.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)