(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahadev Jankar on Sanjay Jadhav : बंडू छोटा माणूस, त्याला इंग्रजी कळत नाही, माझ्या नादी लागू नको, महादेव जानकरांचं भाषण ऐकाच
Mahadev Jankar on Sanjay Jadhav :
Mahadev Jankar on Sanjay Jadhav, Parbhani : परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरादार हल्लाबोल करत आहेत. जो मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार ? असा सवाल करत ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. दरम्यान, संजय जाधव यांच्या टीकेला महादेव जानकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "बंडू जाधव तू माझ्या नादी लागू नको, फार अवघड होईल", असं महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटलं आहे.
महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहे. माझ्या नादी लागू नको, फार अवघड होईल. शिवाय आपण हिंदकेसरी सोबत निवडणूक लढतोय. कुणाच्या धमक्यांना घाबरू,नका असं आवाहनही जानकर यांनी केले आहे.जानकरांनी परभणीच्या पुर्णा तालुक्यात प्रचार बैठकीदरम्यान संजय जाधव यांना इशारा दिलाय.
ओबीसी-मराठा जातीवाद काढला जातोय
पुढे बोलताना महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, मी मतदारसंघातील कोणतेही गाव सोडणार नाही. मी हिंद केसरीबरोबर लढलोय. पवार साहेब मोठे आहेत. वसंतदादा, शंकरराव चव्हाण मोठी माणसं आहेत. मी नांदेडला उभा राहिलोय. नांदेडहून सांगलीला आलो. सांगलीनंतर माढ्याला उभारलो. माढ्यानंतर बारामतीतून लढलो. आता मी परभणीला आलोय. मी हिंद केसरीबरोबर लढाई लढतोय आणि हा महाराष्ट्र केसरी काय करतोय. माझी विकासाची लढाई आहे. ओबीसी-मराठा जातीवाद काढला जातोय. पण मला मराठ्यांचे मतदान सर्वांत जास्त मिळणार आहे. मराठ्यांसाठीच्या एका समितीचा मी सदस्य होतो. मराठ्यांसाठी चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला, असंही महादेव जानकर यांनी सांगितलं.
मी परभणीत विकासासाठी काम करणार आहे
मला उपरा म्हणतोय. तुझं गाव लातूर आहे नव्हं. मी परभणीत विकासासाठी काम करणार आहे. दिल्लीत थांबावं लागलं तरी थांबणार आहे. परभणीचे भवितव्य बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला इथे पाठवलं आहे. 22 जागा भाजपला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने मला ही जागा सोडली आहे. माझी तुम्हाला विनंती विकासासाठी मला मतदान करा. माझं चिन्ह शिट्टी आहे. लक्षात ठेवा, असं आवाहनही महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं.
इतर महत्वाच्या बातम्या