एक्स्प्लोर

Mahadev Jankar : प्रत्येक वेळेस लोकसभा लढतो,16 दिवस जिल्ह्यात जातो अन् पावणे पाच लाख मतदान घेतो; हे माझं रेकॉर्ड : महादेव जानकर

Mahadev Jankar, मुंबई : "महाराष्ट्रात असं आहे की, मी प्रत्येक वेळेस लोकसभेला लढतो. 16 दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदान घेतो. हे माझं रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा नांदेडची जागा लढवली."

Mahadev Jankar, मुंबई : "महाराष्ट्रात असं आहे की, मी प्रत्येक वेळेस लोकसभेला लढतो. 16 दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदान घेतो. हे माझं रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा नांदेडची जागा लढवली. त्यानंतर सांगली, माढा, बारामती आणि पर्वा परभणी लढलो. त्यामुळे आमची मतांची टक्केवारी वाढतं चाललेली आहे. माझे नगरसेवक आहेत, 4 राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे", असे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर दावा ठोकला

महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांध्ये टेक्निकली जी मान्यता लागते ती आम्ही मिळवलेली आहे. आम्ही सध्या महायुतीत आहोत. त्यांनी सन्मानजनक जागा मिळाव्यात अन्यथा 288 जागा लढणार आहोत. शिवाय  महादेव जानकर यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.

महादेव जानकर म्हणाले, सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा भाग आहे. लोकसभेला मला त्यांनी जागा सोडली होती. दुर्दैव त्यामध्ये माझा पराजय झाला. 4 लाख 87 हजार मतदान मला मिळालं. महाराष्ट्रात माझे 4  आमदार निवडून आले. नगरसेवक आहेत, जिल्हापरिषद सदस्य आहेत. उत्तरप्रदेश मध्येही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही फिल्म आघाडी काढतोय

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही फिल्म आघाडी काढतोय. काही वर्कर आहेत, त्यांच्यासाठी आज युनियनची घोषणा होत आहे. यामध्ये आमचे ठाकूर आहेत, यादवजी आहेत. त्यांना मी म्हटलं की पक्षाच्या अंतर्गत युनियन असावी. 29 ऑगस्ट रोजी आमच्या पक्षाचा वर्धापनदिन अकोला येथे होणार आहे. त्यासाठी आमच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात बैठका सुरु आहेत. कमीत कमी 50 हजार लोक अकोल्याला 29 ऑगस्ट रोजी एकत्र येतील. पडद्यामागील कलाकारांवर अन्याय होऊ नये. यासाठी आमची युनियन आणि पक्ष त्यांना ताकद देईल. त्यांना रोज पैसा व्यवस्थित मिळाला पाहिजे, पगार त्यांना मिळत नाही. जो डायरेक्टर आहे, मधला एजंट आहे, तोच पैसे खातो. कलाकारांना देत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन कामगारांना स्वच्छ भावनेतून मतदान करता येईल. त्यादृष्टीने राष्ट्रीय समाज पक्ष प्रयत्न करेल, असा शब्द महादेव जानकर यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Mahadev Jankar : महायुतीमध्ये आम्हाला 50 जागा मिळाव्यात, अन्यथा 288 जागा लढवणार; महादेव जानकरांचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget