Mahadev Jankar : महायुतीमध्ये आम्हाला 50 जागा मिळाव्यात, अन्यथा 288 जागा लढवणार; महादेव जानकरांचा इशारा
Mahadev Jankar, मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे. महायुतीने सन्मान जनक जागा द्याव्यात. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात. अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार आहोत, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे.
![Mahadev Jankar : महायुतीमध्ये आम्हाला 50 जागा मिळाव्यात, अन्यथा 288 जागा लढवणार; महादेव जानकरांचा इशारा Mahadev Jankar We should get 50 seats in the Mahayuti alliance otherwise we will contest 288 seats in Maharashtra Politics Warning of Mahadev Jankar Marathi News Mahadev Jankar : महायुतीमध्ये आम्हाला 50 जागा मिळाव्यात, अन्यथा 288 जागा लढवणार; महादेव जानकरांचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/5ea2e0d93dbe393d55252434d880eec01723299824372924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahadev Jankar, मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे. महायुतीने सन्मान जनक जागा द्याव्यात. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात. अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार आहोत, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे. शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.
महादेव जानकर काय काय म्हणाले?
महादेव जानकर म्हणाले, सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा भाग आहे. लोकसभेला मला त्यांनी जागा सोडली होती. दुर्दैव त्यामध्ये माझा पराजय झाला. 4 लाख 87 हजार मतदान मला मिळालं. महाराष्ट्रात असं आहे की, मी प्रत्येक वेळेस लोकसभेला लढतो. 16 दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदान घेतो. हे माझं रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा नांदेडची जागा लढवली. त्यानंतर सांगली, माढा, बारामती आणि पर्वा परभणी लढलो. त्यामुळे आमची मतांची टक्केवारी वाढतं चाललेली आहे. माझे नगरसेवक आहेत, 4 राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्रात माझे 4 आमदार निवडून आले. नगरसेवक आहेत, जिल्हापरिषद सदस्य आहेत. उत्तरप्रदेश मध्येही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही फिल्म आघाडी काढतोय
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही फिल्म आघाडी काढतोय. काही वर्कर आहेत, त्यांच्यासाठी आज युनियनची घोषणा होत आहे. यामध्ये आमचे ठाकूर आहेत, यादवजी आहेत. त्यांना मी म्हटलं की पक्षाच्या अंतर्गत युनियन असावी. 29 ऑगस्ट रोजी आमच्या पक्षाचा वर्धापनदिन अकोला येथे होणार आहे. त्यासाठी आमच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात बैठका सुरु आहेत. कमीत कमी 50 हजार लोक अकोल्याला 29 ऑगस्ट रोजी एकत्र येतील. पडद्यामागील कलाकारांवर अन्याय होऊ नये. यासाठी आमची युनियन आणि पक्ष त्यांना ताकद देईल. त्यांना रोज पैसा व्यवस्थित मिळाला पाहिजे, पगार त्यांना मिळत नाही. जो डायरेक्टर आहे, मधला एजंट आहे, तोच पैसे खातो. कलाकारांना देत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन कामगारांना स्वच्छ भावनेतून मतदान करता येईल. त्यादृष्टीने राष्ट्रीय समाज पक्ष प्रयत्न करेल, असा शब्द महादेव जानकर यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंविरोधात मुस्लिम समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, मातोश्री बाहेर तणाव वाढला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)