(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब? लोकसभेसाठी दोन फॉर्म्युले; एक वंचितसोबत, एक वंचितशिवाय
Lok Sabha Election 2024: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. तर काही जागांबाबतचा पेच सुटल्याचंही समोर आलं आहे.
Maha Vikas Aghadi Seat Sharing : मुंबई : निवडणूक आयोगानं (Election Commission) आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्या आहेत. पण राज्यात (Maharashtra Politics) जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) दोन्हीकडे जागावाटपावरुन जबरदस्त रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दोन्ही आघाड्यांकडून मात्र काही जागांवरही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशातच सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. तर काही जागांबाबतचा पेच सुटल्याचंही समोर आलं आहे. अशातच कोणाच्या वाट्याला किती जागा यावरुनही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे दोन फॉर्म्युले निश्चित झाल्याचं समोर आलं आहे.
वंचितसोबत आणि वंचितशिवाय कसा असेल मविआचा फॉर्म्युला?
महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) सोडून 22-16-10 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, महाविकास आघाडीनं जर वंचितला सोबत घेतलं, तर मात्र 20-15-9-4 यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9, वंचित बहुजन आघाडीला 4 जागा असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून 2, काँग्रेस पक्षाच्या कोटातून 1 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून 1 जागा देण्यावर पक्षांची तयारी असून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकीकडे लक्ष लागलं आहे.
हाताकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार आहेत. तर, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. माढामधून रासपला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिली जाणार आहे. तसेच, भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार?
1. जळगाव
2. बुलढाणा
3. यवतमाळ वाशीम
4. हिंगोली
5. परभणी
6. छत्रपती संभाजीनगर
7. धाराशिव
8. शिर्डी
9. नाशिक
10. ठाणे
11. कल्याण
12. पालघर
13. मुंबई उत्तर पूर्व
14. मुंबई दक्षिण
15. मुंबई दक्षिण मध्य
16 मुंबई उत्तर पश्चिम
17. उत्तर मुंबई
18. रत्नागिरी सिंधुदुर्ग
19. रायगड
20. सांगली
21. हातकणंगले (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा)
22. मावळ
काँग्रेसच्या वाट्याला 16 जागा
1. पुणे
2. नंदुरबार
3. धुळे
4. नागपूर
5. अमरावती
6. भंडारा
7. चंद्रपूर
8. गडचिरोली
9. जालना
10. नांदेड
11. लातूर
12. उत्तर मध्य मुंबई
13. कोल्हापूर
14. सोलापूर
15. अकोला
16. रामटेक
राष्ट्रवादी काँग्रेस शरजचंद्र पवार गटाला 10 जागा
1. शिरूर
2. सातारा
3. बारामती
4. माढा
5. रावेर
6. दिंडोशी
7. अहमदनगर
8. बीड
9. वर्धा
10. भिवंडी