एक्स्प्लोर

Madha Loksabha : 5 कारखाने चालवले, भालकेंविरोधात बाजी मारली, तुतारी ते भाजप, सोलापूरच्या अभिजित पाटील यांचा प्रवास

Madha Loksabha : धाराशिव , सांगोला आणि पंढरपूरसह 5 साखर कारखाने चालवणारा 30 वर्षाचा अभिजित पाटील नावाचा तरुण सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या स्थानावर पोचला आहे.

Madha Loksabha : धाराशिव , सांगोला आणि पंढरपूरसह 5 साखर कारखाने चालवणारा 30 वर्षाचा अभिजित पाटील नावाचा तरुण सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या स्थानावर पोचला आहे. खरे तर राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असणाऱ्या अभिजित पाटील यांनी गेली सहा ते सात वर्षे खासगी कारखानदारीत आपला दबदबा निर्माण केला. मूळचा पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे असणाऱ्या या पाटलांचे घराणे अफझल खानाच्या हल्ल्यात विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करणारे घराणे म्हणून ओळख आहे.

भालकेंविरोधात बाजी मारली 

सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षे बंद असणारा सांगोल्याचा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेऊन पुन्हा यशस्वी रीतीने सुरु केल्यावर अभिजित पाटील पहिल्यांदा चर्चेत आला. त्यानंतर पंढरपूर तालुक्याचे सत्ताकारण ठरवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत तरुणांच्या मदतीने सत्ताधारी भालके गटाला पराभूत केले.  सलग 3 वर्षे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत अभिजीत पाटील यांनी बाजी मारली होती. 

अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या सोबत असायचे

पाहिल्यावर्षी साडे सात लाख टन गाळप केल्यावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून केला.  यानंतर राष्ट्रवादी फुटल्यावरही अभिजित पाटील यांनी शरद पवार याना साथ दिली.  सोलापूर जिल्ह्यात पवार यांचा सर्वात जवळचा आणि लोकप्रिय तरुण राजकारणी म्हणून त्यांची ओळख तयार झाली. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीत अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या सोबत असायचे. चालू वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने विक्रमी 10 लाख 81 हजार टन उसाचे गाळप केले. तीन हजाराचा भाव दिल्याने सोलापुरातील इतर साखर कारखान्यांना त्याच पद्धतीने भाव द्यावा लागला. 

न्यायालयात मिळविलेली स्थगिती 25 एप्रिल रोजी संपली

याच काळात 2021 पासून विठ्ठल कारखान्यावर असणाऱ्या 442 कोटी कर्जाचा विषय कोर्टात सुरु झाला होता . पूर्वीच्या सत्ताधाऱ्याने केलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर आली आणि त्यांनी जवळपास 37 कोटी कर्जाची फेडही केली. मात्र शिखर बँकेने वसुलीसाठी न्यायालयात जोर लावल्याने अभिजित पाटील यांनी DRT न्यायालयात मिळविलेली स्थगिती 25 एप्रिल रोजी संपली. 

२६ एप्रिल रोजी शरद पवार लोकसभा प्रचारासाठी करमाळा , सांगोला आणि पंढरपूर येथे आले होते. याच दिवशी अभिजित पाटील पवार यांच्या करमाळा येथील सभेत असताना शिखर बँकेने सकाळी अकरा वाजता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. सभा सोडून पाटील हे कारखान्यावर पोहोचले. मात्र बँकेचे अधिकारी कारवाई करून निघून गेले. याच दिवशी रात्री शरद पवार पंढरपूर येथे मुक्कामाला होते. मात्र जप्ती प्रकरणी शरद पवार यांच्याकडून कोणतीही मदत होऊ शकली नाही. याच दिवशी त्यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरु केलेला शरद पवार गट आणि काँग्रेसचा प्रचार पूर्ण बंद केला आणि प्रचार यंत्रणा थांबवल्या. 
 
26 ते 28 एप्रिल दरम्यान अभिजित पाटील यांनी सर्वबाजूने प्रयत्न केल्यावरही न्यायालयात किमान 25 टक्के म्हणजे 100 कोटी रक्कम भरल्याशिवाय जप्तीची कारवाई मागे घेतली जाणार नव्हती. यानंतर कारखान्याचे 30 हजार सभासद , कामगार आणि संचालक मंडळाशी चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्यावर आधी शेतकऱ्यांचा हा राजवाडा वाचवावा, अशी भूमिका सर्व शेतकरी सभासद आणि सहकार्यांनी घेतली. 

फडणवीस यांनी मदतीची तयारी दाखवली 

29 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता अभिजित पाटील यांनी सोलापूर येथे हॉटेल बालाजी सरोवर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी मदतीची तयारी दाखवली आणि दिलासा देण्याचा शब्द दिल्यावर तातडीने पाटील यांनी शेतकरी , कामगार आणि सर्व सहकाऱ्यांची बैठक बोलावली. 30 एप्रिल रोजी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून भाजपचा प्रचार करण्याची भूमिका घेण्यात आली . 

1 मे - सायंकाळी कारखान्यावर मोठा मेळावा घेत येथे माढा लोकसभा उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत  भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. 

3 मे -- फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे सकाळी आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई बँकेने मागे घेतली. 

5 मे -- अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस याना कारखान्यावर निमंत्रण दिले . ५ मे रोजी फडणवीस दुपारी 1 वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांनी बोलावलेल्या सभेस हजेरी लावणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील याना मदत करीत माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळी यशस्वी केली. याचा थेट फटका  राष्ट्रवादीचे माढा लोकसभेतील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरचे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा...

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget