Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा...
Uddhav Thackeray on Amit Shah : मला सावरकरांवर बोलायला सांगतात, त्यांना म्हणतो शामाप्रसाद मुखर्जीवर बोला.
![Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा... Uddhav Thackeray on Amit Shah said talk about Savarkar, Uddhav Thackeray said your political father supported British Maharashtra Politics Marathi News Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/3b8d1a701014507e7d4bc9e0393c39d81714751478483924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray on Amit Shah : "मला सावरकरांवर बोलायला सांगतात, त्यांना म्हणतो शामाप्रसाद मुखर्जीवर बोला. तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीग सोबत सत्तेत बसले होते. त्यांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं. आम्ही इंग्रजांना पत्र लिहिलं होतं. कायदा आणि सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो. चले जाव चळवळ कशी वाईट आहे हे तुमच्या मुखर्जींनी लिहिलं होतं. ते का बोलत नाहीत. एवढ खोलात जाऊन बोलण्यापेक्षा 10 वर्षात काय केलं ते सांगा", असं आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी पीएम मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाहांवर (Amit Shah) कडाडून हल्लाबोल केला.
तुम्ही शंकराचार्यांना न घेता भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन बसलात
उद्धव ठाकरे म्हणाले, मला हिंदूत्वावर आव्हान देतो. तुम्ही शंकराचार्यांना न घेता भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन बसलात. मी 22 जानेवारीला शिवसैनिकांना घेऊन काळाराम मंदिरात गेलो होतो. त्याच्या इतिहास माहिती आहे. आंबेडकरांनी सांगितलं होतं, राम आमचा सुद्धा आहे. या मंदिरात जाण्याचा अधिकार मला सुद्धा आहे. आंदोलन करुन आंबेडकर मंदिरात गेले. तेव्हासुद्धा तुमच्या सारखे बुरसटलेले गोमुत्रधारी त्यांना विरोध करत होते. आमचं हिंदूत्व सुधारणावादी हिंदूत्व आहे. काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नाही.
7 तारखेला विनायक राऊतांना मतदान करा
मला भाजपच्या नितीमत्ता असलेल्या लोकांबद्दल , नेत्यांबद्दल माझ्या मनात आस्था आहे. संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. कोकण माझ्या हक्काचं आहे. तुमच्यासमोर प्रचार कशाल करु ? कारण आपलं नातं मोदी-शाहांसारखं नाही. बोहत पुराना रिश्ता है. 7 तारखेला विनायक राऊतांना मतदान करा हे आवाहन आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. सुधीर मुनंटीवार याच्या तोंडातून विकृत भाषा बाहेर येत होती. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय भाजपचे घरगडी आहेत. दिल्लीत 4 जून नंतर आमचं सरकार येईल. गोमूत्र धारी याचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, असंही ठाकरेंनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray on Narayan Rane : शुभ बोल रे नाऱ्या, तुला लाज लज्जा नाही, तू आडवा ये गाडून पुढे जातो, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर घणाघात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)