उत्तम जानकर यांचा उद्याचा पेपर फुटला! शरद पवारांकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड, उत्तम जानकर उद्या हाती घेणार तुतारी
उत्तम जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या गटातील 30 वर्षाचे वैर संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे साधणार आहेत.
सोलापूर: माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) हे उद्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला साथ देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. जयंत पाटील , जयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार याना साथ देण्याची घोषणा करणार हे निश्चित झाले आहे .
उत्तम जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या गटातील 30 वर्षाचे वैर संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे साधणार आहेत. या घटनेमुळे भाजपच्या माढातीस अडचणी वाढणार असून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस याना धोबी पछाड दिल्याचेही दिसणार आहे. याबाबत उत्तम जानकर हे उद्याच्या मेळाव्यात ही भूमिका जाहीर करणार असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र आमचे तुतारी हाती घ्यायचे ठरले आहे असे सांगत लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला उत्तम जानकर हे सूत्र या मेळाव्यात समोर येणार असल्याची माहिती ABP माझाला दिली आहे .
भाजपकडून वारंवार फसवणूक, कार्यकर्त्यांची तीव्र भावना
भाजपकडून वारंवार फसवणूक होत असल्याची कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती. यानंतर उत्तम जानकर यांच्या फडणवीस यांच्या सोबत तीन बैठक झाल्या. यात जानकर यांचे समाधान झाले असले तरी कार्यकर्ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने जानकर यांनी काल पुणे येथे जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. आपला निर्णय उद्याच्या मेळाव्यात जाहीर करणार असून कार्यकर्त्यांना फडणवीस आणि शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन कार्यकर्त्यांना निर्णय काय घ्यायचा हे विचारले जाणार असल्याचे जानकर सांगत आहेत .
माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो
दरम्यान, उत्तम जानकर आज शरद पवारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेऊन 19 एप्रिलला आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. जानकर यांच्या निर्णयाचा माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
33 महिने किती सहन केलंं आम्हाला माहिती, फडणवीसांना कधीही अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य