Loksabha Election : 74 लाख मतदार, मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज! मतदारांना मोबाईल बाळगण्यास बंदी
मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाकडून मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाकडून मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदानासाठीचे साहित्य घेऊन मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. आता मतदान प्रक्रियेसाठी ही मतदान केंद्रे सज्ज झाली असून 20 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदान सुरु होणार आहे. या मतदान केंद्रांना प्रतीक्षा आहे ती मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची! सर्वच मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदान करण्यासाठी जाताना सोबत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही, ही बाब मतदारांना आवर्जून लक्षात ठेवावी लागणार आहे.
सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा
मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील 7384 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज या मतदारसंघांतील 26 विधानसभा क्षेत्रात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना नियुक्त मतदान केंद्रांवर पोहोच कऱण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार केंद्रांवर नाव शोधण्यासाठीही याठिकाणी स्वयंसेवक नियुक्त कण्यात आले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता मतदारांनी सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी
ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणूक (Loksabha Election) 2024 च्या अनुषंगाने ठाणे व पालघर लोकसभा मतदारसंघात सोमावारी मतदान होणार आहे. पुणे, कोकण, गोवा, बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा मुंबई व गुजरातच्या दिशेने वाहनाचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्फत वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
2004 पासून भाजपशी युती करण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरला, त्यांच्याबद्दल आदर असल्याने सोबत राहिलो, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट