एक्स्प्लोर

Manoj Jarange: मराठा आरक्षणाने निवडणुकीची हवा फिरवली! बीडनंतर सोलापूर, माढ्यातही मनोज जरांगे फॅक्टर महायुतीला भोवला

बीडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे (Manoj Jarange)  फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे  सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात फक्त मनोज जरागेंचा इफेक्ट दिसला आहे.  

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)  भाजपला (BJP) मोठा  धक्का बसला आहे. महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला. महाराष्ट्रात मविआने महायुतीला धोबीपछाड केले. आता  राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील. पराभवाची कारणे समोर येईल. बीडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे (Manoj Jarange)  फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात फक्त मनोज जरागेंचा इफेक्ट दिसला आहे.  

मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघात  पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना 45420 मत तर मोहोळ मतदारसंघातून 63152 मतांचे असे एकूण 1 लाख 8572 मतांचे मताधिक्य दिले आणि यामुळेच हा विजय झाला.

माढा आणि सोलापुरात मराठा समाजाचा रोष भाजपला भोवला

माढा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आ बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ल्यात  धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल 52515 मतांचे तर करमाळा येथे अजित दादा गटाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून 41511 मतांचे मताधिक्य मिळाले.  ज्या सांगोला मतदारसंघात मोहिते पाटील 25 हजारांनी मागे राहणे अपेक्षित होते तेथेही जरांगेमुळे केवळ 4482 मतांनी मागे राहिले. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा रोष भाजपला भोवला आणि जोडीला मुस्लिम व मागासवर्गीय यांनी केल्या विरोधी मतदानामुळे भाजपाच्या हातून या दोन्ही जागा गेल्या.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठवाडा धुमसतोय?

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठवाडा धुमसत होता. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा युती सरकारने काढला नाही, अशी समाजाची भावना आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने आपली ताकद मराठा समाजाने दाखवून दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी  जालन्यातील अंतरवाली सराटीमधून सुरुवात केली. अंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. परंतु त्यांची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला.  मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget