एक्स्प्लोर

VBA : वंचितनं अखेर पत्ते उघड केले, महाविकास आघाडीशी फारकत, नागपूरमध्ये वेगळा निर्णय, गडकरींचं टेन्शन वाढणार  

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीनं नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात आहेत.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय भूमिका स्पष्ट केली. वंचित महाविकास आघाडीसोबत (MVA) आघाडी करणार नसल्याचं आज स्पष्ट झालं आहे.वंचितची काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये  काही निर्णय घेण्यात आले आहेत. प्रकाश शेंडगे हे ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगलीत लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितनं जाहीर केला आहे.  मुस्लिम,जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांजे यांच्यासोबत चर्चा झाली  असून ते  30 मार्चपर्यंत भूमिका कळवणार आहेत,असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

नागपूरमध्ये वंचितचा काँग्रेसला पाठिंबा  

वंचित बहुजन आघाडीनं रामटेक लोकसभा मतदारसंघात आज सायंकाळ पर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.  वंचित बहुजन आघाडीनं आतापर्यंत दुसऱ्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं  शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली होती. आता नागपूर लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचं यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून म्हटलं होतं. महाविकास आघाडी आणि  वंचित बहुजन आघाडी यांची होणार नसल्याचं स्पष्ट झाली आहे. 

ओबीसी, मुस्लीम आणि जैन उमेदवार देणार

प्रकाश आंबेडकर यांनी या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमची भूमिका ही ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न होते. महाविकास आघाडीसोबत  आघाडी करताना ओबीसी उमेदवार, मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत आणि मनोज जरांगे फॅक्टर लक्षात घ्यावं,अशी भूमिका मांडली होती. वंचितनं आज आठ उमेदवार जाहीर केले आहेत.

वंचितचे उमेदवार

भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार

नागपूरमध्ये ठाकरेंना दिलासा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नागपूरची जागा काँग्रेसकडे गेली आहे. काँग्रेसनं नागपूरच्या जागेवर आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितनं नागपूरच्या जागेवर विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला. यामुळं नागपूरमध्ये ठाकरे विरुद्ध गडकरी लढतीतत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार. 

संबंधित बातम्या : 

Shiv Sena UBT Candidates List Lok Sabha Election 2024 :  शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवार जाहीर, उर्वरित पाच जागांचे काय?

Amol Kirtikar Shiv Sena UBT Candidates :  इकडे ईडीची नोटीस, तिकडे लोकसभेचे तिकीट, अमोल किर्तीकर अखेर मैदानात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget