एक्स्प्लोर

गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार, कंत्राटी भरती बंद ते जातनिहाय जनगणना , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शपथनामा प्रकाशित

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी शपथनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जातनिहाय जनगणना ते शेतकऱ्यांना हमीभाव देणार असं सांगण्यात आलं आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचा (NCP SP) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) साठी शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे. 

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा शपथनाम्यातील काही गोष्टी वाचून दाखवल्या. शपथपत्रातील प्रमुख गोष्टी  

- स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती करुन 500 रुपयांवर आणणार 

-पेट्रोल आणि डिझेलवरील कराची फेररचना, महागाई रोखण्यासाठी प्रयत्न

- केंद्राकडील 30 लाख रिक्त जागांवर भरती करण्याचा आग्रह

-महिलांना शासकीय नोकऱ्यात 50 टक्के आरक्षण

-जीएसटीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणार  

- शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार

- शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार

-जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार

-आरक्षणावरील 50 टक्केची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार
 
- खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करणार 

- जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार 

- आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद  करणार

- शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करणार 

- शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी आणणार 

- खाजगीकरणावर मर्यादा आणणार

- अग्निवीर योजना आम्ही बंद करणार

- वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू

- प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ 

- अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू

वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. पाच वर्षांसाठी आमचे खासदार निवडून जातील, त्यांना हे विषय कमी पडतील, असं वंदना चव्हाण म्हणाल्या.  महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.  शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 

संबंधित बातम्या : 

Eknath Khadse : रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, एकनाथ खडसेंनी प्रचाराचं प्लॅनिंग सांगितलं, म्हणाले मी भाजपमध्ये नसलो तरी...

Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget