परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडीची परभणी शहरातील देशमुख हॉटेलजवळ शिवसेनेच्या काही तरुणांनी तपासणी केली यावरून काही काळ तणाव निर्माण झाला.
परभणी : परभणीतील (Parbhani) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची गाडी परभणी शहरात शिवसेनेच्या काही तरुणांनी तपासल्यावरुन काही काळ तणाव निर्माण झाला होता. अशा पद्धतीनं गाडीची तपासणी करणं योग्य नसल्याचं म्हणत जानकर आणि रत्नाकर गुट्टेंनी मोंढा पोलीस ठाण्यात (Mondha Police Station) धाव घेतली आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडीची परभणी शहरातील देशमुख हॉटेलजवळ शिवसेनेच्या काही तरुणांनी तपासणी केली यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. गाडी तपासली जात असताना महादेव जानकर हे गाडीत नव्हते त्यांचा चालक आणि त्यांचे पीए होते. मात्र अशा पद्धतीने तपासणी करणे योग्य नसल्याचा आरोप करत महादेव जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. रात्री उशिरा हे दोन्ही नेते नवा मोंढा पोलीस बसून होते. महादेव जानकर यांच्या चालकाने याबाबत फिर्याद दिली असुन संबंधित शिवसेनेच्या तरुणांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या तरुणांवर गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी हेही पोलीस ठाण्यात बसुन होते यांनीही याबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून संबधित कार्यकर्त्यांनी तुम्ही पैसे वाटतं आहेत का असे म्हणत अधिकार नसताना त्यांनी गाडी तपासणी केली आहे. याबाबत आम्ही गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी दिली आहे.
राजकारण चांगलेच तापले
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परभणीच्या लोकसभा मतदारसंघातही वातावरण राजकारणानं भारलेलं आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) येथून महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ते इथे जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीने संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डख (Punjab Dakh) निवडणूक लढवतील. या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह इतर 31 उमेदवार आपलं भवितव्य आजमवणार आहेत. 31 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हे ही वाचा :
Video : मराठा तरुण भडकला, थेट महादेव जानकरांना भिडला, कॅमेऱ्यासमोरच प्रश्नांची सरबत्ती!