Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आलीय.
बीड : पंकजा मुंडेंकडे (Pankaja Munde) एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती अससल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. . पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात दहा कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे.. विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्जही 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी या शपथपत्रात दिलीय. तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आलीय.
पंकजा मुंडे यांनी काल भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी सादर केलेले आपल्या संपत्तीच्या विवरणामध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे एकूण 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे. आपला उमेदवारी अर्ज भरताना पंकजा मुंडे यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे सहा कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चलसंपत्ती आहे यामध्ये बँकेतील वेगवेगळ्या ठेवी बंद पत्रे विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स तसेच सोन्याचा यात समावेश आहे.
पंकजा मुंडेंकडे 32 लाख रुपयाचे सोने
पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी आहे. त्यासोबतच दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने पण आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांची 200 ग्रॅम सोने आणि एक लाख 38 हजार रुपयांचे दोन किलोची चांदी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे..
शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडेंनी भरला अर्ज
भाजपच्या (BJP) बीडमधील लोकसभा उमेदवार (Beed Lok Sabha) पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी घरी पूजा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची विधीवत दर्शन घेतलं. तसंच गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे त्या नतमस्तक झाल्या. अर्ज भरल्यानंतर पंकजांनी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहे.
हे ही वाचा :