एक्स्प्लोर

जहाँ वाल्मिक कराड खडा, वहाँ सरकारसेही बडा...; देशमुख हत्या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले तो माझ्या जातीचा...

Santosh Deshmukh: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विविध सवाल उपस्थित केले आहेत.

Santosh Deshmukh बीड: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखी काही आरोप मोकाट आहेत. मात्र, एका उमेद्या व विकासाची दृष्टी ठेऊन गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाचा अशारितीने खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात बीडचे नेते आणि मत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. यावरुन आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विविध सवाल उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड (walmik karad) कोणाचा माणूस आहे?, शिंदे नावाच्या अधिकाऱ्यासोबत कोण बोललं?, खंडणी कोणाच्या नावाने मागितली?, असे प्रश्न उपस्थित करत पोलीस जनतेला वेडे समजतात का?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. वाल्मिक कराड मेन आहे. बाकीच्याला काही अर्थ नाही. तो उजळ माथ्याने फिरतोय. त्याचा व्हिडीओ फिरतोय, रील येतायत.  उघडपणे बोलतो...तो माझ्या जातीचा आहे, वंजारी आहे. फोन तपासा, हफ्ता मागायला कोणी सांगितलं तपासा...वाल्मिक कराड यांच्याकडे बोटं का जातायत?, वाल्मिक कराड सरकार पेक्षा मोठा झालाय का?, कायद्याला गृहित धरलं जातंय, अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

कोण आहेत वाल्मिक कराड?

वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
Maharashtra Live News Updates: सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
Gopichand Padalkar :
"रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, एफआरपी मिळेपर्यंत उपोषण..."; पडळकरांची सोलापूर पोलीसांकडे मागणी, म्हणाले...
Latur News: आधी गोशाळेतला आजारी बैल, नंतर मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश, अखेर लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला पसंतीचा बैल; गावात ओवाळून स्वागत
आधी गोशाळेतला आजारी बैल, नंतर मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश, अखेर लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला पसंतीचा बैल; गावात ओवाळून स्वागत
Rohit Pawar Protest Pandharpur: आम्हीही जिद्दी, आता माघार नाही, रोहित पवारांचं विधान; अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस, प्रशासनाचा पुन्हा एकदा चर्चेचा फेरा
आम्हीही जिद्दी, आता माघार नाही, रोहित पवारांचं विधान; अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस, प्रशासनाचा पुन्हा एकदा चर्चेचा फेरा

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget