Jaykumar Gore:....तर ज्या समाजाने शरद पवार यांना राज्याचा अन् देशाचा नेता बनवल त्यांच्यावर आज अशी वेळ आली नसती; मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला
Jaykumar Gore on Sharad Pawar : ज्या समाजाने त्यांना राज्याचा आणि देशाचा नेता बनवला त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी लगावला आहे.

Jaykumar Gore on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) खूप अभ्यासू नेते आहेत. मात्र आज ते जे मत मांडत आहेत याचा अभ्यास पूर्वी ते सत्तेत असताना त्यांनी केला असता तर ज्या समाजाने त्यांना राज्याचा आणि देशाचा नेता बनवला त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी लगावला आहे. शरद पवारांच्या बाबतीत अजित दादांना जी माहिती आहे ते दुसऱ्या कोणाला माहित असायचे कारण नाही. त्यामुळेच दादा जे बोलतायेत मला तोंड उघडायला लावू नका, यात बरच तथ्य असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
आज जे चक्रव्यूह रचताय ते त्यांच्यावरच जाणार एवढं नक्की- जयकुमार गोरे
आजवर मराठा समाजासाठी जे जे केले आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज जे त्यांच्यावर चक्रव्यूह टाकत आहेत ते त्यांच्यावरच जाणार एवढं नक्की. मात्र राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत विधानसभेला 237 एवढे बहुमत मिळवून देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कोण चक्रव्यूह टाकत आहे त्याला काही किंमत नाही, असा टोलाही जयकुमार गोरे यांनी लगावलाय.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात मोठे आंदोलन छेडले गेले असताना नुकतंच राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकतं. तर घटनेत बदल करता येऊ शकतो. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या























