एक्स्प्लोर

Jayant Patil : जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, काही मतं मिळाली असती तर जिंकलो असतो, मविआबद्दल मोठं वक्तव्य

Jayant Patil : शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीच्या सर्व घटकांसोबत चर्चा करुन आणि आत्मपरिक्षण करुन पुढं जाणार असल्याचं म्हटलं. 

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला (MVA) दोन जागा मिळाल्या. मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) यांना पराभव स्वीकारावा लागला. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मतं मिळाली, अपेक्षेप्रमाणं काँग्रेसच्या आमदारांची मतं न मिळाल्यानं जयंत पाटील यांचा पराभव झाला.  विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं एक मतं फुटलं तर काँग्रेसकडून मदत झाली नाही, असं म्हणत जयंत पाटील यांना नाराजी दर्शवली. याशिवाय जयंत पाटील यांनी आगामी काळात देखील महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं देखील ते म्हणाले.   

जयंत पाटील आज शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले होते. मात्र, ते आजारी असल्यामुळे जास्त भेटले नाहीत,असं त्यांनी सांगितलं. विधानपरिषद निवडणुकीत घोडाबाजार झाला आहे.  निकालचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. महाराष्ट्र राजकारणामध्ये असे राजकारण झाले नव्हते.  राष्ट्रवादी च्या बारा मतांवर उभा होतो त्यात 1मत फुटलं.  माझं 14 मतांचं गणित होते.दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर निवडून येण्याचं गणित होतं. मात्र, राष्ट्रवादीचं एक फुटलं,काँग्रेसकडून दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं मिळाली नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.  

आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत,असं देखील जयंत पाटील म्हणाले. नाना पटोले यांच्या सोबत बोलणं झालं नाही. महाविकास आघाडीचा आणि शेकापचा उमेदवार होतो. 

आमची भूमिका ठाम आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीतील मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवायला बसलेले नाहीत,असं देखील म्हटलं. आमची ताकद आम्हाला माहिती आहे. एक निवडणूक हरलो म्हणून काम करणं थांबवणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.  विधिमंडळात 25 वर्ष काम केलं. कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडले. माझ्या पराभवामुळं विरोधक आणि माझं सभागृह देखील हळहळत आहे, असही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांना धन्यवाद देतो, त्यांनी माझ्या साठी उभे राहिले, असं जयंत पाटील म्हणाले.  माझ्यासाठी शरद पवार यांनी वेळ खर्ची घातला. दिवसातून दोन तीन वेळा संपर्क करत होते. अनेक बैठका झाल्या. शरद पवारांनी हे फसवतील, ते फसवतील हे सांगितलेलं, ते खरं ठरलं. शरद पवार यांनी माझ्यासाठी रात्री पर्यंत जागून बैठका घेतल्या, असं जयंत पाटील म्हणाले. काँग्रेसचा दुसरा पसंतीक्रम आमच्यासोबत होता. पण, तीन ते चार मतं फुटली, असं जयंत पाटील म्हणाले. 

आम्ही काही अजगराच्या विळख्यात अडकलो नाही. हे जे बोलतात त्यांना सांगा आम्ही असे अनेक अजगर बिजगर आयुष्यात चिक्कारवेळा बघितले, आले गेले, असं जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला कौल देणार? सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर!

विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवार सकाळी तडकाफडकी दिल्लीला रवाना, भेटीचे कारण गुलदस्त्यात; चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget