(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोज जरांगेकडे एवढा पैसा येतो कुठुन? ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारेंचा सवाल, म्हणाले, जरांगेंचं नियोजन स्क्रीप्टेड..
जरांगे सारख्या बालिश माणसामुळे मराठा समाजाच नुकसान होत असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली.
Jalna: राज्यात मराठा आरक्षण vs ओबीसी आरक्षणाचा वाद आता वेगळ्याच वळणावर दिसून येत आहे. मनोज जरांगेंच्या वाढदिवसाला करोडो रुपयांच्या जाहिराती वर्तमानपत्रात दिसल्या. यांच्याकडे एवढा पैसे येतो कुठुन? असा सवाल ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय. विधानसभेला उमेदवार उभे करण्याची जरांगेंची धमक नाही. त्यांचं सर्व नियोजन स्क्रिप्टेड आहे असं म्हणत त्यांनी जालन्यातून पुन्हा एकदा जरांगेंवर निशाणा साधला. नुकताच झालेल्या मनोज जरांगेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यावर नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर जोरदार टीका केलीये.
मनोज जरांगे स्वतः म्हणले होते आमच्या आंदोलनात 100 करोडचा घोटाळा झाला, शंभर नाहीतर पाचशे हजार कोटीचा याच्यात घोटाळा झालेला असू शकतो. यात राज्याने, केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे यात बडे मासे कोण हे समोर येईल. असंही ते म्हणाले..
जरांगेंसारख्या बालिश माणसामुळे मराठा समाजाचं नुकसान
जरांगे सारख्या बालिश माणसामुळे मराठा समाजाच नुकसान होत असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली. मनोज जरांगे यानी मराठा समाजाची फसवणूक केली नाही पाहिजे. गेल्या लोकसभेला त्यांनी अशीच उमेदवारी जाहीर करणार असल्याचं आवाहन केलं होत. मनोज जरांगे मालकाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे ते वाचतात आणि बोलतात. असं ते म्हणाले.
ओबीसींविषयी शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
शरद पवारांची आतापर्यंत ओबीसी विषयीची भूमिका स्पष्ट नाही, त्यांनी ती स्पष्ट केली पाहिजे असे नवनाथ हाके म्हणाले. मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षण विषयावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत असताना आता नवनाथ हाकेंनी पुन्हा एकदा ओबीसींवर भूमिका मांडण्याची मागणी केलीये. नवनाथ हाकेंनी याआधीच विधानसभेवरून मनोज जरांगे यांनी घेरल्याचे पहायला मिळाले होते. त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनीही आज जरांगेंना वाढदिवसाच्या बॅनरबाजीवरून घेरल्याचं दिसून आलं.
ओबीसी आमदारांना पाडणार असतील तरी शुभेच्छा
येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला समर्थन करणारे 50 टक्के आमदार विधानसभेत पाठवणार या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या घोषणेचं स्वागत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं आहे. ओबीसी आरक्षणावर कोणताही शब्द न उच्चारणाऱ्या ओबीसी आमदारांना जर जरांगे पाडणार असतील तर त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचंही ते म्हणाले. लक्ष्मण हाके सांगलीमध्ये बोलत होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, येत्या निवडणुकीत जर मराठा समाजाचे 50 टक्के आमदार मनोज जरांगे पाठवणार असतील तर त्याचं स्वागत आहे. पण त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मराठा समाजाचे आमदार विधानसभेत आहेत.