एक्स्प्लोर

Sharad Koli vs Gulabrao Patil : दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटील यांना हरवणार, शरद कोळींचा निर्धार

Jalgaon News : युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघातून आव्हान दिलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्याचा निर्धार त्यांनी केला.

Jalgaon News : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) पराभव करण्याचा निर्धार, ठाकरे गटाचे युवासेना नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी केला. महाप्रबोधन यात्रेत जिल्हाबंदी असलेले शरद कोळी हे आज धरणगाव (Dharangaon) पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

युवा सेनेचे राज्य विस्तारक असलेले शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघातून आव्हान दिलं आहे. शरद कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना 2024 ची निवडणूक ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार असल्याचा निर्धार केला.  

गुलाबरावांचं राजकारण दादागिरीचं
मंत्री गुलाबराव पाटील यांचे 30 ते 40 वर्षाचं राजकारण हे दादागिरीच्या जीवावर चालले आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप शरद कोळी यांनी केला.  धरणगाव आणि जळगाव जिल्ह्यातील दादागिरी मोडून काढण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणार असून, जळगाव ग्रामीण मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं शरद कोळी यांनी जाहीर केलं. 

शरद कोळी नेमकं काय म्हणाले? 
2024 मध्ये गुलाबरावांना ना भूतो ना भविष्य त्यांना मुळासकट उपटून काढणार. यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण आम्ही आता थांबणार नाही. 30-40 वर्षापासून इथे दादागिरी चालू आहे. कोळी समाजाच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन दादागिरी सुरु आहे. पण एकच सांगतो, तुम्ही मंत्रिमंडळाचा गैरवापर करुन, गोरगरिबांना त्रास देताय, ही दादागिरी मोडून काढणार. त्यासाठी 2024 मध्ये मी गुलाबरावांविरुद्ध निवडणुकीला उभं राहणार, त्यांचा पराभव करणार, असा निर्धार शरद कोळी यांनी बोलून दाखवला.  

शरद कोळींची धरणगाव पोलीस ठाण्यात हजेरी 
युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी महाप्रबोधन यात्रेतील धरणगाव येथील भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शरद कोळी यांनी आज धरणगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावली. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रेतील सभा धरणगावात पार पडली होती.  या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध वक्तव्य केल्याचा आरोप करत, शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांना जळगाव जिल्हा बंदी सुद्धा करण्यात आली होती.  

बाईक रॅलीने स्वागत
दरम्यान, शरद कोळी यांच्या समर्थनार्थ दुचाकी रॅली काढून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. दुचाकीवर वरूनच रॅलीत सहभागी होत, शरद होळी यांनी धरणगाव पोलीस स्टेशन गाठले. यादरम्यान धरणगाव शहरातील चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पदाधिकारी तसेच वकील यांच्यासोबत पायी चालतच शरद कोळी यांनी धरणगाव पोलीस स्टेशन गाठले या ठिकाणी त्यांच्या अटकपूर्व जामीनाची कार्यवाही करण्यात आली. 

VIDEO : Sharad Koli on Gulabrao Patil: दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटील यांना Jalgaon Rural मध्ये हरवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget