एक्स्प्लोर

Jalgaon Loksabha : सहजसोपी वाटणारी निवडणूक उन्मेश पाटलांच्या बंडाने चुरशीची, गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात कोण घेणार सरशी?

Jalgaon Loksabha :  जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे, तर ठाकरे गटाने करण पवार यांना रिंगणात उतरवले आहे.

Jalgaon Loksabha :  जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे, तर ठाकरे गटाने करण पवार यांना रिंगणात उतरवले आहे. पीएम मोदींचे नेतृत्व पुढे आल्यापासून जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेहमीच भाजपाला साथ दिलीये. जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदारांची संख्या पाहिली तर भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, सहजसोपी वाटणारी निवडणूक नाराज झालेल्या उन्मेश पाटलांनी (Unmesh Patil) बंड करत थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने थोडेशी कठिण झाली आहे. ठाकरे गटात प्रवेश करताना उन्मेश पाटील एकटेच गेले नाहीत, तर त्यांनी त्यांचे सहकारी आणि मित्र असलेल्या करण पवार (Karan Pawar) यांनाही सोबत नेले. त्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) नुकतेच पक्षात आलेल्या करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

जळगावात कोणाचे किती आमदार ? 

जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे 2, शिंदे गटाचे 3 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. त्यामुळे आमदारांची संख्या पाहिली तर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा एकही आमदार या मतदारसंघात नाही. 

ठाकरे गट शेतकरी समस्यांवरुन आक्रमक 

दरम्यान, भाजपचे एकहाती वर्चस्व असले तरी ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून जनमत आपल्या बाजूने खेचण्याच्या प्रयत्न केला आहे. दुधाचा भाव, पिकविमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन  ठाकरे गटाने रणशिंग फुंकलं आहे. सत्ता असतानाही गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही, असा ठाकरे गटाने केला आहे. 

स्मिता वाघ यांच्यामागे भाजपचे संघटन, करण पवारांचा तगडा जनसंपर्क 

जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यामागे भाजपने संघटन उभे केले आहे. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटना वाघ यांच्यासाठी ताकद लावताना दिसत आहे. शिवाय, महायुतीच्या नेत्यांकडून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, असे असले तरी नुकतेच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेश पाटील आणि करण पवार यांना भाजपच्या रणनितीची संपूर्ण माहिती आहे. भाजप कशापद्धतीने प्लॅनिंग करते, याच्या खाचाखोचा दोन्ही नेत्यांना माहिती आहेत. करण पवार यांचा जनसंपर्क तगडा आहे. शिवाय माजी मंत्री सतीश पाटील यांनी करण पवार यांच्यामागे ताकद उभी केली आहे. तर दुसरीकडे वंचितनेही युवराज जाधव यांना उमेदवारी देत तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंचे करण पवार यांच्यामध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chandrakant Patil: शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget