एक्स्प्लोर

Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार

Maharashtra Lok Sabha Elections: सांगलीच्या जागेवरुन विशाल पाटील, विश्वजित कदम आणि ठाकरेंमध्ये काही मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Maharashtra Sangli Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक (Maharashtra Congress Meeting) पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत. पुण्यातून विश्वजित कदमही त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत. अजुनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत. 

जागावटपाबाबात चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना जाहीर करण्यात आली. पण, या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तू तू मैं मैं करता-करता अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पदरात पडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळालेला. अशातच विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर मनभेद, मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

महाविकास आघाडीतील विजयी उमेदवार ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर 

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यासोबतच हिंगोलीचे विजयी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे विजयी उमेदवार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार असलम शेख, मुंबई उत्तर मध्यच्या विजयी उमेदवार वर्षा गायकवाडही मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Sharma : T 20 विश्वचषकातून निवृत्तीवेळी रोहित शर्माने सांगितल्या आठवणीTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 June 2024 : ABP MajhaAmravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
Embed widget