एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'तुम पे ॲक्शन लुंगा, इतनी डेरिंग तुम्हारी...', तो 'व्हिडीओ' जाणिवपूर्वक व्हायरल, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादांची पाठराखण करत महिला अधिकाऱ्यांची दाखवली चूक

Ajit Pawar: आनंद परांजपे यांनी याबाबत अजित पवारांची पाठराखण करताना म्हटलं की, "डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे.

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे की, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जात आहे आणि अजित पवारांनी शेतकरी विरोधी कारवाई थांबवण्यासाठीच निर्देश दिले होते.

याचा अर्थ कारवाई थांबवा असं त्यांनी म्हटलेलं मी अजिबातच ऐकलेलं नाही

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी म्हटलं की,  प्रशासनाकडे रोखठोक बोलून जनतेला त्वरित न्याय मिळवून देणे ही अजित पवारांच्या कामाची खासियत आहे. गैरवाजवी कामांमध्ये ते कधीच बोलत नाहीत. अजित पवारांचा आवाज त्यांनी ओळखला नसेल, स्वाभाविकपणे त्या त्यांचं बोलत होत्या, रोखठोक बोलणं, प्रशासन असो किंवा जनता, ताबडतोब न्याय मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे, गैरवाजवी कामामध्ये अजित पवार कधी बोलत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणचा त्या वेळचा जो प्रसंग होता, त्यावेळी ते बोललेलं मी ऐकलं, आता वातावरण तणावाचं आहे, माहिती घेऊन त्याबाबत बोलू असं होतं, याचा अर्थ कारवाई थांबवा असं त्यांनी म्हटलेलं मी अजिबातच ऐकलेलं नाही, त्यांच्या स्वभावातच नाही असंही सुनीव तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर...

तर आनंद परांजपे यांनी याबाबत अजित पवारांची पाठराखण करताना म्हटलं की, "डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अजित पवार स्पष्ट बोलतात, योग्य निर्णय घेतात, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे.तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते, असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. तर या घटनेनंतर अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या कुरुडू येथील बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात. 

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण 
7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई 
9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Embed widget