Vijay Wadettiwar: साताऱ्यातील झाडाणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी: विजय वडेट्टीवार
Maharashtra Assembly Monsoon Session: महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथे गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तब्बल 640 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली होती.
![Vijay Wadettiwar: साताऱ्यातील झाडाणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी: विजय वडेट्टीवार Gujrat gst officer buy 640 acre land in Zadani village Kandadi Satara vijay wadettiwar vidhan sabha Adhiveshan 2024 Vijay Wadettiwar: साताऱ्यातील झाडाणी गावात नियम धाब्यावर बसवून गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्याची 640 एकर जमीन खरेदी: विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/77e04fbc5b2e31b0cfe7b4e856baae5d1720515965637954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील (Satara News) दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील झाडाणी या गावात गुजरातच्या एका जीएसटी अधिकाऱ्याने मोठ्याप्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. त्यांनी मंगळवारी हा मुद्दा विधानसभेत मांडला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वनखाते आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील 640 एकर जमीन गुजरातमधील एका अधिकाऱ्याकडून अत्यंत माफक दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी कोण आहे? संबंधित अधिकारी हा गुजरातच्या जीएसटी विभागाचा प्रमुख आहे. त्याने कांदाडी खोऱ्यातील ही जमीन खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. जमीन खरेदीची कमाल मर्यादा पायदळी तुडवण्यात आली. तसेच या जमिनीसाठी रस्ते काढताना ते वनजमिनींमधून खोदून काढण्यात आले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने हे सर्व करण्यात आले. भागात रस्ते खोदताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. महसूल खात्याच्या मालकीच्या जमिनीतून हे रस्ते काढण्यात आले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार सभागृहात सत्ताधाऱ्यांवर संतापले
विधानसभेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सत्ताधाऱ्यांवर चांगलेच संतापताना दिसले. त्यांना सभागृहात महसूल विभागासंबंधी प्रश्न विचारायचा होता. मात्र, तेव्हा विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुजरातच्या अधिकाऱ्याने जमीन खरेदी करताना महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला. एवढी मस्ती आणि दादागिरी...पर्यावरणीयदृष्ट्या हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. आम्ही जेव्हा पत्र पाठवले तेव्हा महुसल विभागाने थातुरमातुर उत्तर दिले. गुजरातच्या जीएसटी अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? खेड आणि मावळच्या दोन प्रांतांचे अधिकार काढण्यात आले, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)