Girish Mahajan : अशोक चव्हाण यांच्या मुलीच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकू, विनंती देखील करू : गिरीश महाजन
Girish Mahajan on Shreejaya Chavan, नांदेड : श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकू, विनंती देखील करु. त्यांची तिकीटासाठी मागणी आहे, तशीच आमची देखील आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.
Girish Mahajan on Shreejaya Chavan, नांदेड : श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकू, विनंती देखील करु. त्यांची तिकीटासाठी मागणी आहे, तशीच आमची देखील आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. आज भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गिरीश महाजन यांच्या हस्ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
त्यांना हिंदू धर्माबद्दल इतका काय द्वेष आहे? मला हे कळत नाही
गिरीश महाजन म्हणाले, जितेंद्र आव्हाड नेहेमीच वादग्रस्त विधान करत राहतात. त्यांना हिंदू धर्माबद्दल इतका काय द्वेष आहे? मला हे कळत नाही. वाटेल तशी विधान करत असतात. हे त्यांचे विधान तसेच आहे. सरकारचा इतक्या जनतेसाठी योजना आहेत ते बघून त्यांचा पोटात दुखत आहे. काही तरी कारण शोधायची नरेटिव्ह सेट करायचा. त्यातला हा प्रचार आहे. जितेंद्र आव्हाड यांची विश्वासार्हता किती आहे? असा सवालही गिरीश महाजन यांनी केला.
बांगलादेशात काय होईल? हे पवार साहेबांनी हे सांगितले होते का?
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, बांगलादेशात काय होईल? हे पवार साहेबांनी हे सांगितले होते का? इथे मोर्चे निघतील म्हणून बांगलादेशातील कारण झालं मग या ठिकाणी जो अत्याचार झाला ते शब्दात सांगता येणार नाही. समाजात तेढ करायचे त्याला काही अर्थ नाही. आताच्या योजनामुंळे राज्यातील चित्र बदलले आहे. आता फक्त अफवा करायच्या एवढंच काम त्यांचाकडे राहिले आहे.
आई,बाबा यांना तुम्ही साथ दिली आता मलाही द्या
मी नवीन आहे मला साथ द्या माझ्या आजी,आजोबा,आई,बाबा यांना तुम्ही साथ दिली आता मला ही द्या, असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांनी नांदेडमधील मतदारांना साद घातली आहे. आज भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गिरीश महाजन यांच्या हस्ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीजया चव्हाण बोलत होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या