Majeed Memon Joins TMC: राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश, नोव्हेंबरमध्ये सोडला होता पक्ष
Majeed Memon News: राष्ट्रवादीचे माजी राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन आणि सौगता रॉय यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
Majeed Memon: राष्ट्रवादीचे माजी राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन आणि सौगता रॉय यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. माजिद मेमन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रवादी पक्षातून राजीनामा दिला होता.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना त्यांनी शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांनी पक्ष सोडण्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचं सांगितलं होत. माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, "माझ्या 16 वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या कार्यकाळात मला आदर आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानू इच्छितो. वैयक्तिक कारणांमुळे, मी तात्काळ प्रभावाने राष्ट्रवादीचे पक्ष सोडत आहे. माझ्या शुभेच्छा पवार साहेब आणि पक्षाला सदैव आहेत." मेमन हे 2014 ते 2020 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते.
Trinamool family grows stronger.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) December 14, 2022
With a vision to serve people, eminent criminal lawyer and former Rajya Sabha MP of NCP, Shri Majeed Memon joined us in New Delhi today in the presence of MP Shri Saugata Roy and Parliamentary Party Leader, Rajya Sabha, Shri @derekobrienmp. pic.twitter.com/Hq9rsbV7T5
कोण आहेत माजिद मेमन?
माजिद मेमन हे राजकारणी तसेच वकील आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय यावरील संसदीय समितीचे सदस्य म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून देखील काम केले आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. ते 2020 मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले. दरम्यान, माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने ते चर्चेत आले होते. विरोधकांना सल्ला देताना ते म्हणाले होते की, त्यांनी (विरोधकांनी) पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा विचार करावा. ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या विरोधकांच्या दाव्यांना आता काहीही आधार नाही. ते म्हणाले होते, "ते (मोदी) दिवसाचे 20 तास काम करतात. नरेंद्र मोदींचे हे असाधारण गुण आहेत, ज्यावर टीका करण्यापेक्षा कौतुक केले पाहिजे."
इतर बातम्या: