एक्स्प्लोर

Former Chief Ministers join BJP : अशोक चव्हाण ते अमरिंदर सिंग, आता कमलनाथ यांची चर्चा; काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेले किती नेते भाजपच्या गळाला?

Former Chief Ministers join BJP : गेल्या दहा वर्षात भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची 2019 मध्ये दुसरी टर्म सुरु झाल्यानंतर अनेक काँग्रेस (Congress)नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली.

Former Chief Ministers join BJP : गेल्या दहा वर्षात भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची 2019 मध्ये दुसरी टर्म सुरु झाल्यानंतर अनेक काँग्रेस (Congress)नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस (Congress) युक्त भाजप (BJP) परिस्थिती झाल्याची टीका अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. काँग्रेसमध्ये उभं आयुष्य घालवलेल्या नेत्यांनी आत्ता भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले आहेत. काँग्रेसने ज्यांना मुख्यमंत्रिपद दिले. ज्यांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदं भूषवली,अशा नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे खासदार 77 भाजपच्या गळाला लागले आहेत. जाणून घेऊयात गेल्या 10 वर्षात किती माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय....

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु 

लोकसभा निवडणुकीला 90 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलानाथ  काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कमलनाथ यांनी या अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी या यादीत कमलनाथ (Kamalnath) यांना समावेश नाही. 

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप प्रवेश

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांचं मोठ नाव आहे. ते केवळ एकदाच नाही तर दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवाय त्यांचे वडिलही काँग्रेसकडूनच मुख्यमंत्री होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी मंत्रिपदही भूषवली. तरिही वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची बंडखोरी 

पंजाबच्या राजकारणात वर्चस्व असणाऱ्या अमरिंदर सिंग यांनीही 2021 मध्ये काँग्रेसचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 80 दशका सिंग यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी अमृतसरमधून अरुण जेटली याचा लाखाच्या फरकाने पराभव केला होता. त्यांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदही भूषवले होते. 

विजय बहुगुणांचा 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश 

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला. ते आठ माजी आमदारांसह भाजपमध्ये गेले होते. 2014 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. 2012 ते 2014 या कालावधीत त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांची बहिण उत्तरप्रदेश काँग्रसची अध्यक्षा होती. वडिलही काँग्रेसमध्ये सक्रिय होते. 

एसएम कृष्णा यांनीही सोडला होता काँग्रेसचा 'हात'

एसएम कृष्णा कृष्णा हे 1999 ते 2004 या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 1968 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले होते. शिवाय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासमवेतही त्यांनी काम केले होते. ते महाराष्ट्राचे राज्यपाल देखील झाले होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुढे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 

किरण कुमार रेड्डींनी गेल्यावर्षी केले काँग्रेसला रामराम 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी 2023 मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आंध्र प्रदेशच्या विभाजनामुळे नाराज झाल्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढला. मात्र, पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

पेमा खांडू 32 आमदारांसमवेत भाजपमध्ये 

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे देखील काँग्रेस नेते होते. 2016 मध्ये त्यांनी पीपुल्स ऑफ अरुणाचलच्या 32 आमदारांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. खांडू जुलै 2016 मध्ये सत्तेत आले होते. मात्र, शेवटी तेही भाजपच्या गळाला लागलेले पाहायला मिळाले.

गुलाम नबी आझाद यांनी काढला स्वत:चा पक्ष

गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसला रामराम केला होता. 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेल्या आझाद यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. 1980 मध्ये त्यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 82 मध्ये केंद्रीय मंत्री देखील झाले. काही काळ महाराष्ट्राच्या जागेवरुन राज्यसभेचे सदस्य होते. गेल्या काही वर्षात पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांची जवळीक वाढल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात होते. 

नारायण राणे शिवसेनेकडून मुख्यमंत्री, काँग्रेसकडून मोठ्या संधी तरीही भाजपमध्ये 

नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री केले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांना अनेकदा मंत्रिपद भूषवली. मात्र, तरिही त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर स्वत:चा पक्ष काढला. मात्र, 2019 मध्ये ते देखील भाजपमध्ये गेले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Narendra Modi : आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड संख्येने ओबीसी मंत्री, पहिल्यांदा एका गुर्जर मुस्लीमाला मंत्रिपद दिलं; नरेंद्र मोदी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget